Lok sabha Election Result 2024 Live Saam Tv
लोकसभा २०२४

Lok sabha Election Result 2024: बंगालमध्ये टीएमसी सुसाट; दिल्ली, गुजरात आणि बिहारमध्ये काय आहे कल?

West Bengal Lok sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. दिल्ली, गुजरात आणि बिहारचे काय आहे कल जाणून घ्या...

Satish Kengar

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होऊन आता जवळपास तीन तास झाले असून हळूहळू चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्येच पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी आपलं वर्चस्व सिद्ध करताना दिसत आहेत. तर एनडीएला देखील काही जागांवर यश मिळताना दिसत आहे.

येथे लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. यातच टीएमसी येथे 30 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर एनडीए 10 आणि इतर 2 जागेवर आघाडीवर दिसत आहे.

दिल्ली

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आम आदमी पक्षाची सरकार आहे. येथे लोकसभेच्या एकूण 7 जागा आहे. भाजप येथून 7 ही जागेवर आघाडीवर आहे.

गुजरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. येथे लोकसभेच्या एकूण 26 जागा आहे. ज्यामध्ये एनडीए 25 तर इंडिया आघाडी 1 जागेवर आघाडीवर दिसत आहे.

बिहार

बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहे. येथे भाजप आणि जेडीयू सत्तेत आहे. येथे एनडीए 32 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर इंडिया आघाडी 8 जागावर आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT