Sanjay Raut And Narendra Modi
Sanjay Raut And Narendra Modi Saam TV
लोकसभा २०२४

Sanjay Raut News: ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लावली तर PM मोदींना गोल्ड मिळेल; संजय राऊतांचा टोला

Satish Daud-Patil, डॉ. माधव सावरगावे

Sanjay Raut criticizes PM Narendra Modi

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी खोटे बोलणारे पंतप्रधान असून जर ऑलम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लावली, तर मोदींना गोल्ड मिळेल, असा टोला संजय राऊत यांनी हाणला आहे. मोदींनी देशाचं मोठं नुकसान केलं असून यावेळी निश्चितच त्यांचा पराभव होणार, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धघाटन करण्यात आले. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांची देखील उपस्थिती होती. संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंची हवा सुरू आहे म्हणून विरोधात उमेदवार मिळत नाहीये. खैरे हे मनाने ५ वर्ष दिल्लीतच होते, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) आम्ही महाराष्ट्रात ३५ जागा जिंकू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले ही शौर्यगाथा आहे. त्यावर आधारित चित्रपटावर बंदी घातली जातेय. निवडणुकीत मोठा विजय होऊनही काँग्रेसने कधी विजयाचा ढोल वाजवला नाही, असंही राऊत म्हणाले.

देशाच्या पंतप्रधान काय बोलावं? प्रधानमंत्री मटण खाण्याचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचाराचा काढतात. मोदी हे नेहमीच खोटे बोलतात. जर ऑलम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लावली, तर त्यांना तिथे पाठवा गोल्ड मेडल मिळणारच, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

अवतारी पुरुषाच्या काळात जवळपास १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या आत्महत्या रोखण्यात त्यांना का यश आलं नाही, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. मला अटक करुन काय उघडलं. मी असा भगवा फिरवत गेलो आणि परत आलोही. जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे निवडून येणार नाहीत. ते परत दिल्ली पाहणार नाहीत, असंही राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : कोल्हापुरात शरद पवार गटाच्या जयकुमार शिंदेंनी दिला राजीनामा

Solo Trip: लग्नानंतर सोलो ट्रीपला जाण्याचे फायदे जाणून घ्या ?

T-20 World Cup 2024: T-20 WC स्पर्धेतील सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर! टीम इंडिया या संघासोबत करणार दोन हात

Effects of Fruit Juice: उन्हाळ्यात फळांचा ज्यूस पिताय? जाणून घ्या दुष्परिणाम

Pune Crime News: पुण्यामध्ये पुन्हा 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरचौकात ६ जणांनी तरुणांची केली निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT