Kalyan Lok Sabha constituency
Kalyan Lok Sabha constituency Saam Tv
लोकसभा २०२४

Kalyan Lok Sabha: गणपत गायकवाड यांच्या पत्नीची ठाकरे गटाला साथ, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

साम टिव्ही ब्युरो

Kalyan Lok Sabha constituency:

>> अभिजित देशमुख

कल्याण लोकसभा मतदारसंघात स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तरीही स्थानिक पातळीवर अजूनही भाजप आणि शिवसेनेत सगळं काही आलबेल असल्याचं चित्र दिसून येत आहे.

आज भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला आहे. कल्याणमध्ये त्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे देखील त्यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. सुलभा गायकवाड यांचा ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी प्रचार हा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

'सुलभा गायकवाड या भाजपाच्या पदाधिकारी नाहीत त्यामुळे त्यांचा निर्णय हा महायुतीचा निर्णय होऊ शकत नाही'

दरम्यान, यावरच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे, मात्र कल्याणमध्ये भाजपा शिवसेना राष्ट्रवादी इतर मित्रपक्ष हे सर्व एकत्र आहेत आणि एकमताने काम करतायत.''

ते म्हणाले, ''माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे काही समर्थक भाजप पदाधिकारी असतील की, नाही, याची गॅरंटी नाही. त्यांचे काही समर्थक काही वलग्ना करतात. आमदार गायकवाड यांची पत्नी भाजपा सदस्य आहे की, नाही ते देखील माहित नाही.

विश्वनाथ भोई म्हणले, ''त्या पदाधिकारी देखील नाही. त्या फक्त आमदार पत्नी आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय हा भाजपचा निर्णय किंवा महायुतीचा निर्णय होऊ शकत नाही. महायुतीवर कल्याण आणि भिवंडी या दोन्ही मतदारसंघात काही वाद नाही. सर्व एकत्र आहोत आणि एकदिलाने काम करतोय.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकाचं नुकसान होण्याची शक्यता

PM Narendra Modi Property: घर, गाडी, जमिनही नाही! PM मोदींकडे फक्त इतकीच कॅश; एकूण संपत्ती किती?

Hina Khan Post : पीरियड्स आले असताना हिना खानने ४० डिग्री सेल्सियसमध्ये केलं काम; नंतर म्हणाली...

Weightloss Foods: वजन कमी करण्यासाठी 'हा' पदार्थ करा ट्राय

T20 World Cup: T-20 वर्ल्डकप तोंडावर असताना या ५ कारणांमुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन

SCROLL FOR NEXT