Beed News Saam Tv
लोकसभा २०२४

Jyoti Mete: ज्योती मेटे यांचा अप्पर सहनिबंधकपदाचा राजीनामा, बीडमधून लोकसभा निवडणूक लढविण्यावर शिक्कामोर्तब

Beed Lok Sabha Constituency: दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉक्टर ज्योती मेटे या आता लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

विनोद जिरे

Beed Lok Sabha Constituency:

एक मोठी राजकीय बातमी समोरआली आहे. दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्रामच्या सर्वेसर्वा डॉक्टर ज्योती मेटे या आता लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्योती मेटे यांनी अप्पर सहकार विभागाच्या सहनिबंधकपदाचा राजीनामा देत स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. संबंधित विभागाने ज्योती मेटे यांचा राजीनामा स्वीकारल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे.

यामुळे ज्योती मेटे यांचा लोकसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून त्यांच्या बीड लोकसभा निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाला आहे. यातच ते शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढू शकतात अशी चर्चा आहे. मात्र या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळाले नाही. एक चर्चा अशी आहे की, त्या मनोज जरांगे पाटलांचा अपक्ष झेंडा हाती घेऊ शकतात. मात्र ही अद्यापही फक्त चर्चाच आहे.

दरम्यान, राजीनामा देण्याआधी माध्यमांशी संवाद साधताना लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत ज्योती मेटे म्हणाल्या की, ''गेल्या अनेक दिवसांची पोकळी भरून काढण्यासाठी आता मी ठरवलं आहे. त्यामुळे मी आता यापुढे पूर्णपणे राजकीय काम करणार आहे.'' यावेळी ज्योती मेटे शिवसंग्राम भवन येथे आल्या असता, तिथे उपथित कार्यकर्त्यांनी 'बिड का खासदार कैसा हो, ज्योती मेटे जैसा हो', असं म्हणत घोषणाबाजी देखील केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT