Uddhav Thackeray On Pm Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: नकली शिवसेना ही तुमची डिग्री आहे का?, आंबट गोड मैदानावरून उद्धव ठाकरेंची PM मोदींवर टीका

Uddhav Thackeray On Pm Modi: नकली शिवसेना ही तुमची डिग्री आहे का?, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

Satish Kengar

Uddhav Thackeray On Pm Modi:

नकली शिवसेना ही तुमची डिग्री आहे का?, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचं म्हटलं होतं, यावरच प्रत्युत्तर देताना पालघर येथील बोईसरमधील प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करत उद्धव ठाकरे यावेळी सभेत बोलताना म्हणाले की, ''यापुढे मी जी टीका करणार आहे, ती पंतप्रधानांवर नाही, नरेंद्र मोदी यांच्यावर करणार आहे. कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी अपमान करू शकत नाही. तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय? तुम्ही महाराष्ट्राबाहेरील आहात. महाराष्ट्रात येऊन जी शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. नकली म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?''

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत ते म्हणाले की, ''मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाही. तुम्हाला संपवायला लावलं आहे, तुम्हाला कळलं नाही.'' ते म्हणाले, ''महाराष्ट्राच्या हक्काचं कोणाला ओरबडू देणार नाही. दहा वर्ष दिली, त्याचं सोनं नाही तर माती केली.

ठाकरे म्हणाले, ''एका पक्षाचे एका व्यक्तीचे सरकार देशाला हुकूमशाहीकडे नेते. माझं स्वातंत्र्य टिकऊ शकला नाहीत, तर भारत माता देखील प्रश्न विचारेल. '' ते म्हणाले, ''मी बोललो तर बोललो. परत फिरणार नाही. भाजपसाठी फक्त मत असतील, पण माझ्यासाठी आशीर्वाद.''

दरम्यान, सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोईसर ते वांद्रे लोकलने प्रवास केला. बोईसरमधील सभा आटोपल्यानंतर उद्धव ठाकरे कारने बोईसर रेल्वे स्थानकावर पोहचले. उद्धव ठाकरे येताच कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी करत उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर हे देखील होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT