Tejashwi Yadav Saam TV
लोकसभा २०२४

INDIA आघाडी 300 जागा जिंकलीय, पाचव्या टप्प्याच्या मतदानाआधीच तेजस्वी यादव यांचा मोठा दावा

Tejashwi Yadav News: लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे चार टप्पे पार पडले असून पाचव्या टप्प्यासाठी सोमवार म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी एकूण सात टप्प्यात मतदान होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीचे मतदानाचे चार टप्पे पार पडले असून पाचव्या टप्प्यासाठी सोमवार म्हणजेच 20 मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी एकूण सात टप्प्यात मतदान होत आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा 1 जून रोजी होणार असून 4 जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर कोणाचे सरकार सत्तेत येणार याचा निर्णय होईल.

मात्र, एनडीए आणि इंडिया आघाडीचे नेते आधीच आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. बिहारमधील बेतिया येथे एका निवडणूक सभेला केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी घोषणा केली की, राहुल गांधींना 40 जागाही मिळणार नाही आणि लालूजींना चार जागाही मिळणार नाही. यातच आता पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या काही तास आधी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनीही मोठा दावा केला आहे.

रविवारी संध्याकाळी पाटणा येथे माध्यमांशी संवाद साधताना तेजस्वी यांनी इंडिया आघाडीच्या विजयाचा दावा केला. ते म्हणाले की, इंडिया आघाडी जिंकली असून आम्ही 300 जागांचा टप्पा पार केला आहे. तेजस्वी यादव यांच्या दाव्याबाबत भाजपकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

याआधी पश्चिम चंपारणमधील एका निवडणूक सभेतदरम्यान तेजस्वी यांनी दावा केला की, केंद्रात इंडिया आघाडी सरकार स्थापन होत आहे. सरकार स्थापन होताच राहुल गांधी एक कोटी तरुणांना नोकऱ्या देणार आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी गरीब भगिनींच्या खात्यावर एक लाख रुपये पाठवले जातील. प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिट मोफत वीज आणि पाचशे रुपयांचा गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.

तेजस्वी म्हणाले की, नितीश कुमार तिथे गेले नाही तर, त्यांना भाजपच्या लोकांनी हायजॅक केले आहे. मला माहित आहे की, काकांचे शरीर तेथे आहे आणि त्यांचे हृदय येथे आहे. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, तेजस्वीचे एक हेलिकॉप्टर रोखण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि अनेक मंत्री दिवसाला 20 हेलिकॉप्टरची मदत घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT