Lok Sabha Election Exit Polls LIVE Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Exit Polls LIVE: नव्या संसदेत नवं सरकार कुणाचं? INDIA आघाडी की NDA? एक्झिट पोलची इंटरेस्टिंग आकडेवारी

Lok Sabha Election Exit Polls LIVE: देशात 44 दिवसांच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेनंतर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. मात्र त्याआधी देशाचा मूड काय आहे? हे एक्झिट पोलमधून समोर आलं आहे.

Satish Kengar

देशात 19 एप्रिलपासून सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीची आज सांगता झाली. 1 जून रोजी म्हणजेच आज एकूण 8 राज्यांतील 57 जागांवर मतदान झाले. 44 दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. मात्र त्याआधी देशाचा मूड काय आहे? हे एक्झिट पोलमधून समोर आलं आहे.

सर्वेक्षणांमध्ये एनडीएच्या लाटेचा अंदाज

रिपब्लिक इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 371 जागा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोणाला किती टक्के मते मिळू शकतं?

स्कूल ऑफ पॉलिटिक्सच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला 49.30 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 38.40 टक्के मते मिळतील आणि इतरांना 12.30 टक्के मते मिळतील, अशी शक्यता आहे.

केरळमध्ये भाजपचे खाते उघडणार

इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडियानुसार केरळमध्ये एनडीएला 2-3 जागा मिळणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर काँग्रेसला 13-14 जागा मिळतील, असं सांगण्यात आलं आहे. या आकडेवारीनुसार केरळमध्ये भाजपचे खाते उघडले जाणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय युडीएफ+ ला 4 जागा आणि यल्दीयफला 0-1 जागा मिळणार, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT