Aditya Thackeray Saam tv
लोकसभा २०२४

Aditya Thackeray: संविधान बदलणे ही देशासाठी धोक्याची घंटा.. आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Dharashiv Loksabha News: ओमराजे निंबाळकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ओमराजे निंबाळकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत

Gangappa Pujari

संदिप भोसले, धाराशिव| ता. १६ एप्रिल २०२४

धाराशिव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ओमराजे निंबाळकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी लातूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. कृषीमंत्री आहेत तरी कुठे ? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच मंत्रालयात जाऊन गुंड रिल्स काढत आहेत. याकडे कोणाचे लक्ष आहे, सरकार म्हणून काही जबाबदारी आहे की नाही?" असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

"संविधान बदलणे ही देशासाठी धोक्याची घंटा आहे. पंकजा मुंडे आणि अनेक भाजपाच्या बड्या नेत्यांनी संविधान बदलू असं सांगितले आहे. त्यामुळे परिवर्तन होईल. लोक ओमराजे निंबाळकर आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराना निवडून देतील असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकराना सोबत घेण्याचे प्रयत्न संपलेत का?" यावर मात्र आदित्य ठाकरे यांनी बोलन टाळले आहे.

दरम्यान, आज धाराशिवमध्ये (Dharashiv) आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर ते धाराशिवमध्ये सभेला देखील संबंधित करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT