Tanaji Sawant On Devendra Fadnavis Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणले, शिवसेना नेते तानाजी सावंत यांचं वक्तव्य

Tanaji Sawant On Devendra Fadnavis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज मोठे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणून मला आमदार केले असं मोठं राजकीय विधान केले.

साम टिव्ही ब्युरो

Tanaji Sawant On Devendra Fadnavis:

>> भरत नागणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी तथा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज मोठे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणून मला आमदार केले असं मोठं राजकीय विधान केले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विधानामुळे शिवसेनेच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वाकाव या गावी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकदाही नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते आहेत. त्यांनीच मला राजकारणात आणले आणि सावंत कुटुंबातील पहिला आमदार मला केले.

केवळ 55 मत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला 348 मत घेऊन दिली. त्यामुळे मी आमदार झालो, अशी भावना ही सावंत यांनी व्यक्त केली.

अकलूज बोले अन् सोलापूर जिल्हा हाले ही अवस्था आज राहिली नाही. आम्हा सावंत बंधूचे विस्थापित राजकारण असलं तरी आम्ही कधीही स्वामीमान घाण टाकला नाही. जे कोणी स्वतःला दिग्गज समजत असतील, जाणता राजा म्हणत असतील अशांना मी 30 वर्षं टक्कर देतोय माझं कुणी वाकड करू शकलं नाही, असा टोलाही सावंत यांनी शरद पवार यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

SCROLL FOR NEXT