brs leader bhagirath bhalke supports praniti shinde solapur lok sabha election
brs leader bhagirath bhalke supports praniti shinde solapur lok sabha election Saam Digital
लोकसभा २०२४

Solapur Constituency: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रणिती शिंदेंची मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळमध्ये वाढली ताकद; जाणून घ्या राजकीय घडमाेडी

विश्वभूषण लिमये

Praniti Shinde :

साेलापूर लाेकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी बीआरएस पक्षाचे नेते माजी आमदार भगीरथ भालके यांचा पाठींबा मिळाला आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या विराेधात लढणा-या आमदार शिंदे यांचे पारडे जड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या आज (गुरुवार) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल कारणार आहेत. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत हंडोरे यांची उपस्थिती असणार आहे.

दरम्यान पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. बीआरएस पक्षाचे नेते भगीरथ भालके यांनी प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिंदे यांना मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यातील ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंढरपूर पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना एक लाख पाच हजार मतदान झाले हाेते. भालके गट आमदार शिंदेचा प्रचार करणार असल्याने त्याचा फायदा हाेईल अशी शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

SCROLL FOR NEXT