bacchu kadu criticises nitesh rane amravati lok sabha constituency saam tv
लोकसभा २०२४

नितेश राणेंनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये; बच्चू कडू असं का म्हणाले?

Amravati Lok Sabha Constituency : महायुतीने अमरावती लाेकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी वेगळी भूमिका घेण्याचे निश्चित केले आहे.

Siddharth Latkar

संजय सूर्यवंशी, नांदेड

Bachchu Kadu News :

आम्ही शमणारे नाही. त्यांची रक्ततपासणी करण्याची गरज आहे. आम्ही सागरातील लाटा आहोत असे प्रत्युत्तर आमदार बच्चू कडू यांनी आमदार नितेश राणे यांच्या टीकेला दिले आहे. राणेंनी उगाच मिठाचा खडा टाकू नये, असा सल्लाही आमदार बच्चू कडू यांनी राणेंना नांदेड येथे साम टीव्हीशी बाेलताना दिला आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

आमदार बच्चू कडू हे सध्या भाजपवर नाराज झाले आहेत. महायुतीने अमरावती लाेकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने आमदार बच्चू कडू आणि त्यांचे समर्थकांनी अमरावतीत वेगळी भूमिका घेण्याचे निश्चित केले आहे.

आमदार कडू यांच्या नाराजीवर बाेलताना ते सागर बंगल्यावर येऊन शमतील असे विधान आमदार नितेश राणे यांनी केले. त्यावर आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले राणे शमले असतील. त्यांची रक्ततपासणी केली पाहिजे. आम्ही शमणा-यांमधील नाही. आम्ही सागरातील लाटा आहोत. हे राणेंना माहित नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राणेंनी या बाबतीत बाेलू नये. राणेंनी उगाच यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही अमरावती पुरतं लढतोय आणि मैत्री पूर्ण लढत आहोत. तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छेडावे तर त्यात आमची काही हरकत नाही असेही आमदार बच्चू कडू यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT