Ajit Pawar On Chandrakant Patil Saam Digital
लोकसभा २०२४

Ajit Pawar On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं ते विधान महागात पडलं; अजित पवारांची पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी

Baramati Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या शरद पवारांवरीव विधानावर नाराजी व्यक्त केली.

Sandeep Gawade

बारामतीत आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्त्वाचा असल्याचं वक्तव्य चंद्रकांत दादांनी केलं होतं. त्यावर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांचं ते विधान आपल्याला महागात गेलं. बारामतीत येवून शरद पवारांना पाडू, हे बारामतीकरांना आवडलेलं नाही, अशी जाहीर कबुली त्यांनी दिली आहे.

बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा जवळपास दीड लाख मताधिक्यांनी विजय झाला आहे. तर सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीने राज्यात लढवलेल्या चार पैकी रायगड वगळता ३ जागांवर पराभवाला सामोरं जावं लागलं. बारामतीला पराभव अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण पक्षफूटीनंतर त्यांचीही पहिलीचं निवडणूक होती आणि येत्या काही महिन्यात विधारसभेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत याचा परिणाम जाणवू शकतो.

लोकसभा निकालानंतर अजित पवार प्रसारमाध्यमासमोर आले नव्हते. एनडीएच्या दिल्लीतील बैठकीलाही ते गेले नाहीत. दोन दिवसांनंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा निडणुकीच्या निकालावरील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचीही मुंद्दा उपस्थित झाला. बारामतीकरांनी आपल्याला भरभरून पाठिंबा दिला. मात्र यावेळी आम्ही कुठे कमी पडलो माहिती नाही. तरीही जनतेचा कौल स्वीकारावा लागतो. विधानसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचं तयारी सुरू आहे. महायुतीतील प्रमुखाशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले.

बारामतील लोकसभा मतदारसंघात महायुतीने बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी, शरद पवार यांना बारमतीतून पाडणार आणि राजकारणातून संपवणार, असं वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. त्यावेळीही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. आजच्या पत्रकार परिषदेतही तो मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी बारामतीत येऊन शरद पवारांना पाडू, असं बोलणं बारामतीकरांना कधीही आवडणार नसल्याची कबुली त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

इराणकडून अमेरिकेची आर्थिक नाकेबंदी, तेल व्यापार चीनचे चलन युआनमध्ये करणार?

SCROLL FOR NEXT