Nashik Lok Sabha Constituency News Saam Tv
लोकसभा २०२४

Nashik Lok Sabha: नाशिकचा तिढा कायम; इच्छुकांच्या भेटींचा सिलसिला सुरूच, शिवसेनेत नेमकं काय चाललंय?

Shinde Group News: नाशिक लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. येथील विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nashik Lok Sabha Constituency News:

>> अभिजित देशमुख, तबरेझ शेख

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. येथील विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे. तर यात आता शिवसेना नेते अजय बोरस्ते हेही या शर्यतीत उतरल्याचं दिसत आहे. यातच आज सकाळी अजय बोरस्ते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तर सायंकाळी हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री यांचे उत्तर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. यामुळे शिंदे गटात नाशिकांमध्ये दोन गट निर्माण झाले आहे का? अशी चर्चा होत आहे.

या दोन्ही नेत्यांनी एकाच दिवशी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटात दोन गट निर्माण झाले असल्याची चर्चा होत आहे. यातच नाशिक लोकसभा मतदारसंघातून यंदा शिवसेना शिंदे गटाकडून अजय बोरस्ते यांना तिकीट दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे.

याचदरम्यान, आज हेमंत गोडसे यांनी कार्यकर्त्यांसह कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आहे. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना हेमंत गोडसे म्हणाले की, ''जागा कोणत्या पक्षाला सुटणार हा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यावर बऱ्यापैकी तोडगा निघाल्याचे वरिष्ठांनी सांगितलं. मात्र कुठली जागा कुठल्या पक्षाला मिळणार याबाबत अधिकृत रित्या घोषणा झालेली नाही.''

ते म्हणाले, ''पारंपरिक ही जागा शिवसेनेनेच लढवलेली आहे. ही जागा शिवसेनेला सुटावी, असा आमचा आग्रह आहे, तसा मुख्यमंत्री शिंदे यांचा देखील आग्रह आहे. जो काही निर्णय आहे, तो आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील.''

शेवटच्या टप्प्यात निवडणुका असल्या तरी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले. त्यांचा प्रचार सुरू झालाय. त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून अधिकृत उमेदवारी बाबत घोषणा करावी, जेणेंकडून महायुतीच्या उमेदवाराला प्रचार करणे सोपे होईल, या मागणीसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली, असंही गोडसे म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आखाती युद्धाचा परिणाम, मनमाड शहरात एकमेव असलेला गोगॅस पंप झाला ड्राय

Kidney failure symptoms: पाठदुखी हे पहिलं लक्षण नाही; किडनी फेल होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Sonali Bendre: अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा नवरा अडचणीत; मावळच्या शेतकऱ्याने खेचलं कोर्टात, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Politics: २५-३० आमदारांसह राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार; राऊतांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Rate Today: खुशखबर! सोनं झालं स्वस्त; १० तोळ्यामागे १५,३०० रुपयांची घसरण; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

SCROLL FOR NEXT