Sujay Vikhe vs Nilesh Lanke Saam TV
लोकसभा २०२४

Ahmednagar Lok Sabha: शरद पवार गटाविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण काय?

Ahmednagar Lok Sabha Constituency: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.

Satish Daud

Ahmednagar Nilesh Lanke Vs Sujay Vikhe

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेचं एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं. या पोस्टरवर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे याचा फोटो छापण्यात आला आहे. यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आचारसंहितेचा भंग केला जात असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात भाजपचे पदाधिकारी विष्णुपंत अकोलकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली लेखी तक्रार दिली आहे. यामुळे अहमदनगरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे.

भाजपने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी सध्या दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांविरोधात टीकेचा भडीमार केला जातोय. अशातच निलेश लंके यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय राजीव राजळे फोटो असलेलं बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालं.

याविरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार शेगाव येथे जाहीर सभा घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT