Dhananjay Mahadik Saam TV
लोकसभा २०२४

Dhananjay Mahadik: 'लीड देणाऱ्या तालुक्यांना 5 कोटींचा निधी', खासदार धनंजय महाडिकांची ऑफर चर्चेत

Lok Sabha Election 2024: निवडणुका म्हटलं की आश्वासनं आलीच. पण यापुढे जाऊन आमिषं दिल्यास तो वादाचा विषय ठरू शकतो. कोल्हापुरात धनंजय महाडिकांनी दिलेली ऑफर सध्या प्रचंड चर्चेत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Lok Sabha Election 2024: 

सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या आखाड्यात आरोप-प्रत्यारोपांचे डाव टाकले जात आहेत. प्रचार म्हटलं की मतांसाठी मोठंमोठी आश्वासन देणं आलंच. पण कोल्हापुरात काहीसा वेगळाच प्रकार पाहायला मिळालाय. कोल्हापुरात भाजप खासदार धनंजय महाडिकांनी अनोखी शर्यत लावलीये. उमेदवार संजय मंडलिकांना कागल आणि चंदगडपैकी जास्त लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा अधिक निधी देणार असल्याची अजब घोषणा त्यांनी केलीये.

धनंजय महाडिक आणि संजय मंडलिकांकडून अडीच-अडीच कोटी असा निधी देणार असल्याचं महाडिकांनी जाहीर केलं. महाडिकांच्या या घोषणेवर आक्षेप घेत संजय राऊतांनी थेट निवडणूक आयोगालाच आवाहन केलंय.

दुसरीकडे आमदार नितेश राणेंनीही मतदारांना धमकीवजा इशाराच दिलाय. रत्नागिरी- सिंधुदुर्गंमधून नारायण राणेंना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या. जिथं कमी लीड मिळेल, तिथं विकासनिधी कमी मिळाला तर तक्रार करायची नाही, असा धमकीवजा इशाराही राणेंनी दिलाय. तर राणेंच्या इशाऱ्याला अंबादास दानवेंनी सडेतोड उत्तर दिलंय. नितेश राणेंचा हिशोब जनताच घेणार,असं दानवेंनी म्हटलंय.

महायुतीनं 45 प्लसचा नारा देऊन लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलीये. पण आता मतदारांना विविध आमिषं देण्याची वेळ भाजपच्याच नेत्यांवर आली आहे. त्यामुळे निवडणुका चुरशीच्या होणार हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

अचानक धनलाभ होईल, नोकरीत प्रमोशन मिळेल; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन होणार सुरू

कोकणात ठाकरेसेनेचा उमेदवार फोडला; महाराष्ट्राच्या राजकारणात माघारीचा पॅटर्न, कोणी कुठे घेतली माघार?

SCROLL FOR NEXT