Parenting tips, Child care  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Parenting tips : मुलांसमोर चुकूनही या गोष्टींवर चर्चा करु नका, अन्यथा पडेल महागात !

मुलांसमोर बोलताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : मुलं जस जशी मोठी होऊ लागतात तसे तसे त्यांना समजू लागते. आपण पालक म्हणून त्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळी त्याच्या सोबत असतो.

हे देखील पहा -

प्रत्येक पालकाची (Parents) इच्छा असते की आपल्या मुलाने योग्य मार्गावर जावे आणि आयुष्यात कधीही चुकीचे काम करू नये. पण अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत पालक आपल्या मुलांना अशा अनेक गोष्टी सांगतात त्यामुळे त्यांच्या मनावर त्याचा खूप वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत मुलाशी बोलतांना आपण काय बोलत आहोत आणि त्याचे परिणाम काय आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. काहीवेळा मुले गोष्टींचा वेगळा अर्थ काढतात. अशा परिस्थितीत मुलांशी बोलताना पालकांनी लक्षात ठेवायला हवं की मुलांशी बोलताना त्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे.

१. बरेच वेळा आपण रागात आल्यानंतर आपण आपल्या जोडीदाराविषयी किंवा कुटुंबातील इतर व्यक्तीविषयी असणारा राग हा आपल्या मुलांसमोर व्यक्त करतो त्यामुळे मुल देखील त्यांच्याशी तसेच वागू व बोलू लागतात. त्यामुळे मुलांशी बोलताना किंवा वागताना काळजी घ्यायला हवी.

२. मुलांशी (Child) बोलताना नेहमी पैसा किंवा आजाराबद्दल बोलू नका. आई-वडील जेव्हा पैसे किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊन मुलासमोर बोलतात तेव्हा त्यांच्या वागण्यात फरक जाणवू लागतो. त्यांना त्या गोष्टींची अधिक भिती वाटू लागते.

३. आपल्या मुलांची तुलना इतर कोणत्याही व्यक्तीशी करु नये. त्यामुळे मुलांची चिडचिड होऊ लागते. तसेच ते स्वत:ला कमकुवत समजू लागतात यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ लागतो.

४. मुलांवर रागवताना त्यांना अपशब्द बोलू नका. त्याचा त्यांच्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे मुले आपल्यापासून दुरावू शकतात. तसेच ते सतत दुखी होऊन त्याच्या बालमनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT