Diwali 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali 2023 : धनत्रयोदशीला यमदीपदान का करतात? जाणून घ्या कसे, कधी आणि कुठे करायचे

Yamdeep On Dhantrayodashi 2023 : यमदीपदान कधी करावे? का करावे? आणि कसे करावे? हे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Yamdeepdaan 2023 :

धनत्रयोदशीला छोटी दिवाळी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी यमदीपदान देखील केले जाते. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त असतो परंतु, या दिवशी यम देवाची देखील पूजा केली जाते. यंदा ही पूजा १० नोव्हेंबरला केली जाते.

धनत्रयोदशीला शास्त्रानुसार यमराजाला दीपदान केले जाते. यमदीपदान कधी करावे? का करावे? आणि कसे करावे? हे जाणून घेऊया.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. धनत्रयोदशीला (Dhantrayodashi) यमदीपदान का केले जाते?

हंसराजा एकदा आपल्या सैनिकांसोबत शिकारीसाठी गेला होता. शिकारीच्या शोधात राजाची आणि सैनिकांची ताटातूट झाली. त्यावेळी राजा रस्ता चुकल्यामुळे दुसऱ्या राज्यात पोहोचला. दुसऱ्या राज्यातील हेमराज याच्यासमोर हंसराजाने आपली ओळख करुन दिली. हेमराजाने हंसराजाचे आदरातिथ्य केले. हेमराजाला पुत्रप्राप्ती झाली त्या आनंदात हेमराजाने हंसराजाला आणखी काही दिवस राहाण्याची विनंती केली. बाळ जन्माला आल्यानंतर ज्योतिष्याने भाकित केले की, तुझा पुत्र पराक्रमी होईल परंतु, युवावस्थेत विवाहाच्या (Marriage) चार दिवसांनी त्याचा मृत्यू होईल.

हेमराज अस्वस्थ झालेला पाहून हंसराजाने बाळाची जबाबदारी आपल्यावर घेतली. अकाली मृत्यू येऊ देणार नाही असे वचनही दिले. हंसराज बाळाला घेऊन आपल्या राज्यात आला. त्याला महापराक्रमी आणि शुर बनवले. युवावस्थेत आल्यानंतर त्याचे राजकुमारीशी लग्न झाले. विवाहाच्या चौथ्या दिवशी यमदूत राजकुमाराला यमदसदनाला नेण्यासाठी आले. परंतु, त्यांचा जोडा पाहून ते हरखून गेले. राजकुमाराला अभय द्यावे हा विचारही त्यांच्या मनात आला. त्यावेळी यमराज म्हणाले की, मृत्यू अटळ असतो. तो कोणीच टाळू शकत नाही. परंतु, जर आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केल्यानंतर आत्मज्योतीच्या रक्षणार्थ मला दीपदान केले तर अकाली मृत्यू येणार नाही.

2. यमदीपदान कसे कराल?

मृत्यूचा देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत. त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वात करुन तो प्रज्वलित केला जातो. तसेच अकाली मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT