Leg Pain In Periods Saam Tv
लाईफस्टाईल

Leg Pain In Periods: मासिक पाळी येण्यापूर्वी पाय का दुखतात? दुर्लक्ष करू नका असू शकतात ही कारणे

Leg Pain In Periods: मासिक पाळीचे पाच दिवस खूप कठीण असतात. मासिक पाळी येणार असेल तेव्हा किंवा आल्यानंतर अनेक महिलांना असह्य वेदना होतात यामुळे या काळात आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

Manasvi Choudhary

Leg Pain In Periods: वाढत्या वयानुसार शरीरातील हार्मोन्स बदल्यानंतर मुलींन मासिक पाळी येते. स्त्रियांच्या मासिक पाळीचा कालावधी हा दर २८ ते ३० दिवसांचा असतो. हे कालचक्र चुकले तर त्यांना अधिक टेन्शन येते.

मासिक पाळीचे पाच दिवस खूप कठीण असतात. मासिक पाळी येणार असेल तेव्हा किंवा आल्यानंतर अनेक महिलांना असह्य वेदना होतात यामुळे या काळात आरोग्याची (Health) विशेष काळजी घेतली पाहिजे.

मासिक पाळी दरम्यान मुली तसेच महिलांना पोट दुखी, ओटीपोटात तीव्र वेदना, शरीर जड वाटणे, या सारंख्या समस्या उद्भवतात. पण सध्या महिला व मुलींमध्ये पाळीदरम्यान पाय दुखणे,स्नायू दुखणे हे प्रकार वाढले आहेत

1. पाय का दुखतात

मासिक पाळीपूर्वी पाय दुखणे हे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टोरॉन संप्रेरकांच्या बदलांमुळे होते. तसेच हार्मोनल्सच्या बदलांमुळे पाय दुखतात.

2. मासिक पाळीत पाय दुखींपासून आराम मिळवण्यासाठी काही उपाय:

1)गरम पाण्याचा शेक घ्या

मासिक पाळीत पाय दुखत असतील तर गरम पाण्याच्या पिशवीने शेक घेतल्याने वेदना कमी होतात.

2)गरम पाण्याने आंघोळ करा

सध्या थंडीची वेळ आहे म्हणून उबदार पाण्यात आंघोळ केल्याने स्नायू मोकळे होतील यामुळे आराम वाटेल.

3) प्रवास टाळा

मासिक पाळी दरम्यान शक्यतो प्रवास करणे टाळा, आराम करा.

4) कोमट पाण्यात पाय टाका

कोमट मिठाच्या पाण्यात पाय ठेवा ज्यामुळे पायांच्या मज्जातंतूंना आराम मिळेल.

5) हळदीचं दूध प्या

हळद हा स्वयंपाकघरातील एक सामान्य घटक आहे. जो शरीरासाठी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो. त्यामुळे सूज कमी होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT