Premature birth causes  saam tv
लाईफस्टाईल

Women Health : गर्भवती महिलांमध्ये प्रिमॅच्योर प्रसूतीचा धोका का वाढतोय? कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या

Premature birth causes : गरोदर महिलांमध्ये प्रिमॅच्योर प्रसूतीचा धोका वाढण्यामागे जीवनशैलीतील बदल, ताणतणाव, गर्भाशयातील संसर्ग आणि इतर वैद्यकीय कारणे आहेत.

Saam Tv

गर्भधारणेचा पूर्ण कालावधी साधारणतः ४० आठवड्यांचा असतो. मात्र, काही महिलांची प्रसूती ३७ आठवडे पूर्ण होण्यापूर्वीच होते. याला मुदतपूर्व प्रसूती किंवा प्रीटर्म डिलिव्हरी असे म्हणतात. अशा वेळी बाळाचे काही अवयव पूर्णपणे विकसित झालेले नसल्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होणे, कमी वजन असणे आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी या समस्येची कारणे आणि सुरुवातीची लक्षणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

मुदतपूर्व प्रसूती होण्यामागील कारणे कोणती?

तज्ज्ञांच्या मते, मुदतपूर्व प्रसूती होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. गर्भवती महिलेच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे, रक्तक्षय, पोषणाची कमतरता, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामुळे गर्भधारणेत गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तसेच गर्भावस्थेत होणारे मूत्रमार्गाचे किंवा योनीमार्गाचे संसर्गही मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढवू शकतात.

याशिवाय गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखाशी संबंधित समस्या, वार (प्लॅसेंटा) संबंधित गुंतागुंत आणि आधीच्या गर्भधारणेत मुदतपूर्व प्रसूती झालेली असणे हीदेखील महत्त्वाची कारणे आहेत.

या महिलांना अधिक धोका

  • वयाच्या १८ वर्षांपेक्षा कमी किंवा ३५ वर्षांपेक्षा अधिक वयात गर्भधारणा होणे.

  • जुळी किंवा तिळी मुले होण्याची शक्यता असणे.

  • आयव्हीएफ उपचारांद्वारे गर्भधारणा झालेली असणे.

  • गर्भधारणेदरम्यान रक्तक्षय, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असणे.

  • अपुरी झोप, मानसिक तणाव आणि पोषणाचा अभाव.

  • दोन गर्भधारणांमध्ये खूप कमी अंतर असणे.

मुदतपूर्व प्रसूतीची कोणती लक्षणे दिसतात?

गर्भवती महिलांना वारंवार पोटात कळा येणे, ओटीपोटात दाब जाणवणे, सतत कंबरदुखी होणे, योनीमार्गातून रक्तस्राव होणे किंवा पाण्यासारखा द्रव बाहेर पडणे अशी लक्षणे दिसू शकतात. योनीमार्गातून स्त्रावाचे प्रमाण किंवा स्वरूप बदलणे हेही एक महत्त्वाचे लक्षण आहे.

वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

अशी कोणतीही लक्षणे जाणवल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये. तातडीने स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा किंवा रुग्णालयात जावे. नियमित गर्भावस्थेतील तपासण्या, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती आणि मधुमेह व रक्तदाबावर नियंत्रण ठेवल्यास गुंतागुंतींचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. मुदतपूर्व प्रसूती प्रत्येक वेळी टाळता येतेच असे नाही. मात्र, योग्य वेळी निदान आणि वैद्यकीय उपचारांमुळे आई आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Startup Scheme: उद्योजक व्हायचंय? मराठा-कुणबी तरुणांना सरकार दरमहा देणार 25 हजार रुपये! कोणती कागदपत्रे लागणार?

Ramya Krishnan: 'त्यावेळी स्वच्छतागृह नव्हतं, बिसलेरीच्या बाटलीचा करावा लागायचा वापर...'; राम्या कृष्णन यांचा धक्कादायक खुलासा

मुंबईकरांचा प्रवास होणार सुपरफास्ट! पनवेल ते वसई थेट लोकल धावणार; ६९ किलोमीटरच्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी

Maharashtra News Live Update: परभणी जिल्हा व सत्र न्यायालय, गंगाखेडमधील सर्व कर्मचारी बेमुदत संपात सहभागी!

Ajit Pawar: अजित पवारांना धमकावून शरद पवारांचा पक्ष सोडण्यास भाग पाडले, ठाकरेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT