Casual Party look  Saam Tv
लाईफस्टाईल

Casual Party चा प्लान झालाय? रेडी होताना या टीप्स लक्षात ठेवा, दिसाल अधिक सुंदर

Women Fashion Tips : जर तुम्ही देखील अजूनही पार्टी वेअरसाठी ड्रेस सिलेक्ट केला नसेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. त्या फॉलो केल्यातर तुम्ही सगळ्यात सुंदर दिसाल. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंगासोबतही मॅच करता येईल.

कोमल दामुद्रे

New Year Party Plan :

डिसेंबर महिना सुरु झाला की, बरेच ऑफिस, कॉलेज किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींकडे पार्टीचे प्लान सुरु होतात. जुन्या वर्षाला बाय बाय करण्यासाठी आणि नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी अनेक प्लान होत असतात. अशावेळी नेमके कोणते कपडे घालायचे हा प्रश्न अनेकांना पडतो.

जर तुम्ही देखील अजूनही पार्टी वेअरसाठी ड्रेस सिलेक्ट केला नसेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स (Tips) सांगणार आहोत. त्या फॉलो केल्यातर तुम्ही सगळ्यात सुंदर दिसाल. यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंगासोबतही मॅच करता येईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. ड्रेसिंग

जर तुमची पार्टी (Party) थीमवर आधारित असेल तर तुम्ही त्यानुसार कपडे सिलेक्ट करु शकता. कॅज्युअल पार्ट्यांव्यतिरिक्त तुम्ही गाऊन, वन पीस, मॅक्सी ड्रेस, साडी, कॉर्ड किंवा थ्री पीस सेट घालू शकता. यावर हलकासा मेकअप करुन अधिक सुंदर दिसाल.

2. फॅब्रिक

पार्टी वेअरसाठी फॅब्रिकपासून बनवलेले ड्रेस घालणे चांगले. यासाठी वेलवेट किंवा सिल्क फॅब्रिकचा ड्रेसही कॅरी करता येईल. यामुळे तुमचा लूक क्लासी दिसेल. तुमचा ड्रेसिंग सेन्सही वेगळा दिसेल.

3. रंग

तुम्ही कोणत्या ठिकाणी पार्टीला जाताय या गोष्टीवर जास्त भर द्या. कॅज्युअल पार्टीचा ड्रेस हा गडद रंगाचा असावा. लाइट ब्लू कलर हा पार्टीमध्ये रॉयल लुक देतो. पांढऱ्या रंगातही फोटो चांगले दिसतात.

4. अॅक्सेसरीज

पार्टी ड्रेससोबतच अॅक्सेसरीजवरही भर द्यायला हवी. त्यामुळे ब्रँडेड किंवा ट्रेंडी अॅक्सेसरीजला अधिक महत्त्व द्या. तसेच तुम्ही पायत काय वेअर करता हे देखील पाहा. वेज, टाच, शूज किंवा बेली वापरुन पाहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Garlic Paste: आलं-लसूण पेस्ट लवकर खराब होते? मग वापरा 'या' सोप्या टिप्स अन् महिनाभरासाठी साठवा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून ४२ लाख महिला अपात्र, ६८०० कोटींची सरकार वसुली होणार?

कोणतेही पुरावे सापडले नाही...; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर कोर्टाची निरीक्षणे काय? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; प्रा.शिवाजीराव सावंतांनी दिला राजीनामा

Sambhajinagar : बनावट विद्यार्थी दाखवून लाटले साडेसहा कोटी रुपये; चार महाविद्यालयांकडून करण्यात आली फसवणूक

SCROLL FOR NEXT