Winter Beauty Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Beauty Tips : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते? हे घरगुती उपाय करुन पाहा, लगेच दिसेल फरक

Dry Skin In Winter Season : बदलत्या ऋतूनुसार त्वचा कोरडी पडते ज्यामुळे आपल्याला सतत खाज सुटते.

कोमल दामुद्रे

Skin Care Tips :

हिवाळा ऋतू सुरु झाला असून राज्यातील अनेक भागात थंडी जाणवू लागली आहे. अशावेळी बरेचदा त्वचेच्या काळजीकडे दुर्लक्ष केले जाते. बदलत्या ऋतूनुसार त्वचा कोरडी पडते ज्यामुळे आपल्याला सतत खाज सुटते.

या काळात त्वचा जितकी मॉइश्चराइज आणि हायड्रेट ठेवाल तितके तुमच्यासाठी चांगले असेल. या ऋतूमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींचीही विशेष काळजी घ्यायला हवी. व्हिटॅमिन सीचा आहारात समावेश करावा. जाणून घेऊया त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. गरम पाण्याचा वापर करा

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ केली जाते. परंतु, गरम पाणी अधिक गरम असू नये. यामुळे त्वचेचे (Skin) नुकसान होते. गरम पाण्यामुळे तुमची त्वचा कोरडी पडू शकते. या ऋतूमध्ये कोमट पाण्याने आंघोळ करावी.

2. दिनचर्या कशी असायला हवी?

ऋतूनुसार त्वचेची काळजी (Care) घेण्यासाठी दैनंदिन जीवनात बदल करणे आवश्यक आहे. त्वचा कोरडी किंवा तेलकट असेल तर दिनचर्या ठरवा. या काळात पपई, सफरचंद, डाळिंब, केळी इत्यादी काही अशी फळे आहेत ज्याचा वापर त्वचेसाठी आपण करु शकतो. या फळांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे त्वचा अधिक चमकण्यास मदत होते.

3. मॉइश्चरायझर वापरा

त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर वापरा. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही पावडर आधारित मॉइश्चरायझर वापरा. जर त्वचा कोरडी असेल तर तुम्ही क्रीम आधारित मॉइश्चरायझर वापरावे.

4. थंड हवेपासून संरक्षण

हिवाळ्यात (Winter Season) वातावरणात गारवा अधिक असतो. या वेळी त्वचेत कोरडेपणा जाणवू लागतो. यामुळे त्वचा लाल होणे, फुटणे किंवा रखरखीत होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. यासाठी त्वचेला चांगले मॉइश्चरायझ करता येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT