Night sleep habits and health saam tv
लाईफस्टाईल

Sleep Health: जास्त झोप येण्याचे कारण आळस नाही, तर 'या' आजारांचे आहे लक्षण, वाचा सविस्तर

Oxygen Deficiency: पूर्ण झोप झाल्यानंतरही दिवसभर झोप येणे हे आळस नसून हायपरसोम्निया, हार्मोनल असंतुलन किंवा ऑक्सिजनच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. याची कारणे, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

झोप ही प्रत्येकासाठी खूप महत्वाची असते. झोप पूर्ण झाली की, संपूर्ण दिवस फ्रेश, उत्साही आणि सार्थकी लागतो. पण काहींना पुर्ण झोप होऊन सुद्धा दिवसभरात सतत झोप येत असते. ही सवय आळस नसून काही गंभीर आजारांची आहे. पूढे आपण याबद्दल सविस्तर माहिती टिप्स आणि कारणे जाणून घेणार आहोत.

काही लोक, रात्रीची पूर्ण झोप घेतल्यानंतरही, दिवसभर झोप घेत राहतात. त्यांना संधी मिळेल तिथे झोप येते, मग ती बसमध्ये असो, वर्गात असो, मेट्रोमध्ये असो किंवा मीटिंगमध्ये असो. याचे एक कारण म्हणजे. आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता देखील तुम्हाला दिवसभर सुस्त आणि झोपाळू वाटते.

जास्त झोपेमुळे कोणता आजार होतो?

शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्याने आजार होतात. ज्या लोकांच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता असते त्यांना ९ ते १० तास झोपल्यानंतरही झोप येत राहते. असं वाटते की ते बरेच दिवस झोपलो नाही. ही हायपर-सोम्नियाची स्थिती आहे. शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने हे होते आणि यामुळे झोपेची प्रक्रिया बिघडते.

वयानुसार किती तासांची झोप घ्यावी?

नवजात बाळाने दिवसाला १४-१७ तास झोपावे. ३-५ वर्षे वयोगटातील मुलाने १०-१३ तास ​​झोपावे. १४-१७ वर्षे वयोगटातील मुलाने दिवसाला ८-१० तास झोपावे. १८ ते ६४ वर्षे वयोगटातील व्यक्तीने दिवसाला ७-९ तास झोपावे.

जास्त झोपेमुळे होणारा आजार

डायबेटीज

लठ्ठपणा

हार्मोनल असंतुलन

शरीरात फॅट जमा होणे

हृदयरोग

शरीरातील रक्तप्रवाह कमी होणे.

कमकुवत हृदय धमन्या

चांगली झोप का महत्त्वाची आहे?

जास्त वेळ झोपण्याऐवजी, चांगली झोप घेणे महत्वाचे आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, थकवा कमी होतो आणि तुमचे शरीर रिचार्ज होते. हे साध्य करण्यासाठी, दररोज योगासने आणि प्राणायाम करा. दिवसातून एकदा गिलॉय प्या, हळदीचे दूध प्या आणि व्हिटॅमिन सी समृद्ध आंबट फळे खा.

टीप: कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी, तुमच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी किंवा कोणत्याही आजारासाठी कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारूबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

SCROLL FOR NEXT