Belly Fat Saam TV
लाईफस्टाईल

Belly Fat : भारतात पुरुषांना जास्त पोट का सुटते? वाचा कारणे आणि उपाय

Belly Fat Reasons : वाढलेलं पोट पुरुषांमध्ये एखाद्या गरोदर महिलेप्रमाणे दिसतं. त्यामुळे अनेक व्यक्ती हसतात आणि चारचौघांत तुम्ही मजेचा विषय बनता.

Ruchika Jadhav

भारतात अनेक व्यक्ती लठ्ठपणाच्या शिकारी ठरत आहेत. अंगावर वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे आपल्याला विविधा आजार सुद्धा जडतात. त्यामुळे वजन कमी करणे प्रत्येकासाठी महत्वाचे असते. आपल्या उंचीनुसार आपलं वजन किती असावं हे ठरवलं जातं. त्यामुळे उंचीनुसार वजन असणे महत्वाचे आहे. भारतात अनेक पुरुषांना लठ्ठपणाच्या समस्या आहेत. शक्यतो येथील पुरूषांमध्ये ढेरी वाढण्याच्या समस्या जास्त आहेत.

ढेरी वाढल्याने व्यक्ती आहे त्यापेक्षा आणखी जास्त वृद्ध दिसतात. वाढलेलं पोट पुरुषांमध्ये एखाद्या गरोदर महिलेप्रमाणे दिसतं. त्यामुळे अनेक व्यक्ती हसतात आणि चारचौघांत तुम्ही मजेचा विषय बनता. त्यामुळेच आता ढेरी कमी करण्यासाठी काय केले पाहिजे. तसेच पुरुषांमध्ये ढेरी सुटण्याच्या समस्या का आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.

खाण्यापिण्याच्या सवयी

अनेक व्यक्ती घरचं जेवण कमी घेतात. तर जंक फूड जास्त खातात. जास्त प्रमाणात तेलकट आणि बाहेरील पदार्थ खाल्ल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त वाढते. त्यामुळे व्यक्ती लठ्ठ होतात.

शरीराची हालचाल नसणे

पुरुष मंडळी ऑफिसला जातात. तेथे पोहचेपर्यंत प्रवासात त्यांच्या शरीराची हालचाल होते. मात्र त्यानंतर पूर्ण दिवसभर ते एकाच जागी बसून असतात. सतत एकाच जागी बसून असल्याने आणि शरीराची हालचाल न झाल्याने त्यांचे वजन वाढते. यात विशेषत: ढेरी सुटते.

वय वाढणे

वय वाढताना शरीरातील मेटाबॉलिज्म कमी होतं. त्यामुळे पोटावरील चरबी वाढण्यास सुरूवात होते.

दारूचे सेवन

काही पुरुषांना दारूचे जास्त व्यसन असते. त्यामुळे दररोज दारू प्यायल्याने त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. पुरुषांनी दररोज दारू प्यायल्याने त्यांच्या शरीरात पोटावर चरबी वाढते.

उपाय

यावर एकच उपाय आहे तो म्हणजे वर्कआउट. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक पुरुषाने दररोज व्यायाम केला पाहिजे. त्याने पोटावरील चरबी जास्त वाढत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT