लाईफस्टाईल

Blood Pressure : अचानक का वाढू लागतं ब्लड प्रेशर? 'या'कारणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका...

Sudden Causes For Blood Pressure Spikes: ब्लड प्रेशर वाढलं की, अनेक आजार आपल्या मागे लागण्याची शक्यता असते. मात्र अचानक ब्लड प्रेशर का वाढू लागतं हे जाणून घेणं फार गरजेचं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या अनेक आजार आपल्या मागे लागले आहेत. यामधील एक आजार म्हणजे उच्च रक्तदाब. जर कोणत्याही कारणाने रक्तदाब वाढला तर त्याचा तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे हृदयाचं नुकसान होण्याची शक्यता असते. आपला रक्तदाब हा नेहमी योग्य प्रमाणात असला पाहिजे. मात्र अनेकदा जाणूनबुजून किंवा नकळत अशा अनेक गोष्टी करतो, ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढू लागतो.

अचानक रक्तदाब वाढू नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. मात्र अशी कोणती कारणं आहे, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, ते जाणून घेऊया.

कोणत्या कारणांमुळे वाढू शकतो रक्तदाब

व्यायाम केल्याने

वारंवार अधिक व्यायाम केल्याने रक्तदाबाची पातळी वाढण्याची शक्यता असते. जर एखाद्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर त्यांना कोणता व्यायाम फायदेशीर आहे किंवा कोणता व्यायाम धोकादायक ठरू शकतं हे जाणून घेतलं पाहिजे.

कॅफेनचं अधिक सेवन

कॅफिन हा एक घटक आहे जो आपल्या शरीरात प्रवेश करताच रक्तदाब वाढू लागतो. मात्र, असे का घडते याचे मुख्य कारण अद्याप समजू शकलेले नाही. ज्या व्यक्तींना कॉफी प्यायची आवड आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावं की, कॅफेनच्या सेवनाने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो कमी प्रमाणात कॅफेनचं सेवन केलं पाहिजे.

ताणतणाव

तणाव, चिंता आणि नैराश्य ही अनेक आजारांची मुख्य कारणं मानली जातात. ज्यावेळी आपण तणावाखाली असतो तेव्हा तेव्हा शरीरातून अनेक हार्मोन्स बाहेर पडतात ज्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. अशावेळी जेव्हा तुमच्या तणावात वाढ होते तेव्हा रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते.

डिहायड्रेशन

डिहायड्रेशनमुळे देखील अनेकदा रक्तदाब अचानक वाढण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्ही जास्त वेळ पाणी पीत नाही, तेव्हा शरीरात डिहायड्रेशन होऊ लागतं. यावेळी रक्त घट्ट होऊ लागतं, परिणामी हृदयाला मूव्हमेंट अधिक प्रयत्न करावे लागतात. अशा परिस्थितीत रक्तदाब अनेकदा वाढण्याची भीती असते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT