White hair problem, Hair care tips  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

White hair problem : सकाळी उठल्याबरोबर या पदार्थाचे सेवन करा, पांढऱ्या केसांपासून होईल सुटका

अकाली पिकणाऱ्या केसांसाठी हा उपाय करुन पहा

कोमल दामुद्रे

White Hair Problem : आजकाल केस गळण्यासोबतच केस अकाली पिकणे ही समस्या वाढत आहे. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, ताण यामुळे आपल्या शरीरात अनेक बदल होताना दिसतात.

हे देखील पहा -

केस अकाली पिकणे ही समस्या हल्ली तरुण पिढीमध्ये जास्त प्रमाणात दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये ही समस्या सामान्य झाली असून प्रत्येक वयोगटातील व्यक्ती त्याला बळी पडत आहे. अकाली केस पिकल्यामुळे अनेकांना ताण, चिंता व लाज वाटू लागते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास पण डळमळू लागतो. यासाठी आपण केमिक्ल पदार्थांचा केसांसाठी वापर करतो मात्र त्यामुळे केस खराब होऊ लागतात. केस काळे करण्यासाठी महागड्या उत्पादनापेक्षा आपण काही नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास आपले केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल.

१. मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पेस्ट तयार करा आणि डोक्याला लावा, असे काही दिवस केल्यास केसांचा पांढरापणा निघून जाईल.

२. मेथीच्या औषधी गुणधर्मांबद्दल आपल्या सगळ्यांना माहित आहे. केस पुन्हा काळे करायचे असतील तर मेथीचे दाणे पाण्यात उकळवून थंड करा व या पाण्याने केस धुवा.

३. केसांचे (Hair) आरोग्य सुधारण्यासाठी मेथीचा भरपूर वापर केला जातो. मेथी दाण्यासोबत गुळाचे सेवन केल्यास पांढऱ्या केसांपासून लवकर सुटका मिळेल. याशिवाय केसगळती रोखण्यासाठीही मेथी खूप गुणकारी आहे.

४. मेथीचे दाणे बारीक करून पावडर बनवा, त्यात लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या कमी वयातच दूर होईल.

५. नारळाचे तेल (Oil) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते, यासोबतच मेथीचे दाणे बारीक करून डोक्याला लावल्यास पांढरे केस काळे होण्यास मदत होईल व केस गळतीची समस्या आणि कोंडा देखील दूर होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT