Solar eclipse Saam Tv
लाईफस्टाईल

Solar eclipse: वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी लागणार? भारतात दिसणार हा हे ग्रहण? जाणून घ्या वेळ आणि नियम

Second solar eclipse: हिंदू धर्मामध्ये सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. २०२५ मधील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी झालंय. तर मग जाणून घेऊया वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी होणार आहे हे जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यंदाच्या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण २९ मार्च २०२५ रोजी लागलं होतं. तर येत्या काळात वर्षातील दुसरं सूर्यग्रहण देखील लागणार आहे. सूर्यग्रहण लागण्यापूर्वी त्याचे नियम जाणून घेणं फार गरजेचं असतं. याचे वाईट परिणाम आपल्यावर पडू नये यासाठी हे नियम महत्त्वाचे मानले जातात. यंदाच्या वर्षीचं दुसरं सूर्यग्रहण कधी लागणार आहे ते पाहूयात.

कधी लागणार दुसरं सूर्यग्रहण? (solar eclipse date and time)

या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण २१ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे. हे एक आंशिक सूर्यग्रहण असणार आहे. वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण भारतात दिसलं नव्हतं. त्याचप्रमाणे हे दुसरं सूर्यग्रहण देखील भारतात दिसणार नाहीये. त्यामुळे ग्रहणाचं सूतकंही लागणार नाही.

ही कामं करा

सूर्य ग्रहणावेळी तुम्ही भगवान विष्णू यांचं ध्यान करून त्यांच्या मंत्राच्या जप करा. यामुळे सूर्यग्रहणावेळी गायत्री मंत्र आणि महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा. या मंत्रांचा जप करणं लाभदायक मानलं जातं. याशिवाय सूर्यग्रहण संपल्यानंतर तुळशीच्या पानाचं सेवन करा.

मिळणार शुभ परिणाम

सूर्यग्रहण संपल्यानंतर, एखाद्या पवित्र नदीत स्नान केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. परंतु जर तुमच्या जवळ नदी नसेल, तर तुम्ही घरी गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करू शकता. यामुळे देखील तुम्हाला शुभ परिणाम देखील मिळू शकतात.

या गोष्टींचं दान करा

सूर्यग्रहणाचा काळ संपल्यानंतर दान करणं देखील विशेष महत्त्वाचं मानलं जातं. या काळात तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजू लोकांना हरभरा, गहू, गूळ, तांदूळ, मसूर आणि संपूर्ण उडीद डाळ दान करू शकता.

कोणती कामं करू नयेत

जर तुम्ही सूर्यग्रहण पाहत असाल तर उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू नये. या काळात घराबाहेर पडू नका आणि बाहेर प्रवास करू नका. त्याचप्रमाणे अन्न शिजवणं किंवा खाणं देखील शुभ मानलं जात नाही. या काळात केस आणि नखे कापणं देखील टाळावं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aleovera Benefits : तुमचेही केस तेलकट अन् चिकट होतात का? 'हा' घरगुती उपाय करून मिळवा सिल्की केस

CJP Protest: दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ दादरमध्ये आंदोलन, आदित्य आणि अमित ठाकरेंनी घेतली आंदोलकांची भेट| VIDEO

Poladpur Tourism : कोकणातील हे लपलेलं निसर्गरत्न! पावसाळ्यात पुन्हा सजला मोरझोत धबधबा

Drink Water : दररोज सकाळी २ ग्लास पाणी का प्यावं? वाचा चमत्कारिक फायदे

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT