WhatsApp Web  Saam TV
लाईफस्टाईल

तुम्ही WhatsApp Web वापरता? तुमच्यासाठी लवकरच येणार नवीन फिचर

व्हॉट्सअॅप अकाऊंट आणखी सुरक्षित करण्यासाठी आता त्यात आणखी एक फीचर जोडण्यात येणार आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: WhatsApp अकाऊंट आणखी सुरक्षित करण्यासाठी आता त्यात आणखी एक फीचर जोडण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपवरही आता टू स्टेप व्हेरिफिकेशन सुविधा उपलब्ध होणार आहे. हे फीचर्स केवळ डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी असणार आहे आणि वापरकर्त्यांना ते वापरावे की नाही याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सध्या वापरकर्ता नवीन स्मार्टफोन घेतल्यावर WhatsApp लॉग इन केल्यास, अॅप तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरती 6 अंकी कोड पाठवते. त्याच वेळी, डेस्कटॉप लॉगिनसाठी तुम्हाला फक्त WhatsApp वेबवर QR कोड स्कॅन करावा लागतो आणि तुम्ही तुमचे खाते लॉग इन होते. यासाठी तुम्हाला कोणत्याही पिनची गरज लागत नाही.

डेस्कटॉपवर सुरक्षित प्रवेश

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर डेस्कटॉपवर WhatsApp चॅटचा अॅक्सेस अधिक चांगला आणि सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. WABetaInfo म्हणते की WhatsApp सर्वत्र टू-स्टेप व्हेरिफिकेशन व्यवस्थापित करू इच्छित आहे, म्हणून ते येत्या अपडेटमध्ये वेब/डेस्कटॉपवर हे फिचर देण्यावर काम करत आहे. ज्यामध्ये तुम्हाला लॉन इन करताना 6 अंकी नंबर टाकावा लागतो. सध्या हे फीचर चाचणीच्या टप्प्यात आहे. ते लवकरच प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे.

फोन हरवला तर काय होईल?

अहवालात असे नमूद केले आहे की वेब/डेस्कटॉप वापरकर्ते हे फिचर वापरायचे का नाही हे ठरवू शकतात. जेव्हा तुमचा फोन हरवेल आणि तुम्हाला तुमचा पिन आठवत नाही तेव्हा हे आवश्यक होते. तुम्ही रिसेट लिंकद्वारे पिन रिस्टोअर करू शकता.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT