WhatsApp चे नवे फीचर; आता नोटिफिकेशनमध्ये दिसणार मेसेज पाठविणाऱ्याचा फोटो Saam TV
लाईफस्टाईल

WhatsApp चे नवे फीचर; आता नोटिफिकेशनमध्ये दिसणार मेसेज पाठविणाऱ्याचा फोटो

WhatsApp सतत आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर आणतं असते आपल्य़ा युजर्संना कटांळा येणार नाही याचा ते चांगल्या प्रकारे काळजी घेत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : WhatsApp नवीन वर्षाच आपल्या ग्राहकांसाठी एक अनोख फिचर आणलं आहे. आपण सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे ते करताना आपण सर्वांना या निमित्तानं व्हॉटस्अॅप वरुनच नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कारण व्हॉटस्अॅप आता आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य घटकच बनला आहे.

त्यामुळेच व्हॉटस्अॅप सतत आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर आणतं असते आपल्य़ा युजर्संना कटांळा येणार नाही याचा ते चांगल्या प्रकारे काळजी घेत असते आणि त्य़ामुळेच त्यांची बाजारपेठ भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली असून भारतीयांना या व्हॉटस्अॅप शिवाय जगणेच अशक्य झालंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.

तर त्यांच व्हॉटस्अॅपने आणलेलं नवीन फिचर आहे ते म्हणजे, आपण चाट करत असताना नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार आहे. हो WhatsApp ने नवीन वर्षावरती हे नवे फीचर घेऊन युजर्सला खूश करण्याच्या तयारीत आहे. आता मोबाईल स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये मेसेज पाठविणाऱ्याचा प्रोफाईल फोटो दिसणार आहे. नवीन व्हॉट्सअॅप फीचर नोटिफिकेशनमध्ये प्रोफाईल फोटोला सपोर्ट करणार आहे.

हे देखील पहा -

इन्संट मॅसेजिंग App व्हॉट्सअॅपने या वर्षातली त्यांचे पहिले फीचर (Feature) रोलआऊट केले आहे. त्याअंतर्गत सिस्टम नोटिफिकेशनमध्ये युजर आता सेंडरने पाठवलेल्या मॅसेजसोबत त्याचा प्रोफाईल फोटोही पाहू शकणार आहे. व्हॉट्सअॅप प्रोफाईल फोटो युजरला त्याच्या नोटिफिकेशनमध्ये दिसेल. सध्या हे फीचर आयओएस (IOS) यंत्रणेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे त्याची चाचणी सुरू आहे मात्र अद्याप सर्व युजर त्याचा वापर करू शकत नाहीत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT