Chat Transfer Feature  Saam Tv
लाईफस्टाईल

Chat Transfer Feature : WhatsApp नवं फीचर ! QR Codeने लगेच ट्रान्सफर करता येणार नव्या फोनमध्ये जुने चॅट्स

WhatsApp Chat Transfer Feature : व्हॉट्सअॅपने नुकतेच आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New WhatsApp Features : व्हॉट्सअॅपने नुकतेच आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. आता तुम्ही WhatsApp ने QR कोड वापरून जुन्या फोनवरून नवीन फोनमध्ये चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्याचा एक जलद मार्ग सादर केला आहे. जर वापरकर्ते नवीन फोनवरून त्याच ऑपरेटिंग सिस्टमसह दुसर्‍या फोनवर स्विच करत असतील, तर ते नवीन QR कोड-आधारित ट्रान्सफर पद्धत वापरून त्यांचा WhatsApp डेटा ट्रान्सफर करू शकतात.

व्हॉट्सअॅपने QR कोड वापरून जुन्या फोनवरून नवीन फोनमध्ये चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करण्याचा एक जलद मार्ग सादर केला आहे. जुन्या डिव्‍हाइसवरून नव्या डिव्‍हाइसवर WhatsApp चॅट्‍स ट्रान्सफर (Transfer) करण्‍यासाठी, आधी जुन्या डिव्‍हाइसवर WhatsApp उघडा आणि Settings > Chats > Chat Transfer वर जा. पुढील प्रक्रिया येथे वाचा.

चॅट ट्रान्सफर कसे करावे?

जुन्या डिव्‍हाइसवरून नवीन डिव्‍हाइसवर WhatsApp चॅट्‍स ट्रान्सफर करण्‍यासाठी, आधी जुन्या डिव्‍हाइसवर WhatsApp उघडा आणि सेटिंग्‍ज > चॅट > चॅट ट्रान्सफर वर जा . या स्टेप्स फॉलो केल्यानंतर, वापरकर्त्यांना ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नवीन फोनवरून QR कोड स्कॅन करण्यास सांगितले जाईल. हे वाय-फाय कनेक्शनवर वापरावे. या नवीन पद्धतीचा वापर करून त्यांची चॅट हिस्ट्री (History) करण्यासाठी वापरकर्त्यांना दोन्ही फोन चालू ठेवून एकाच वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट केलेले आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे.

आता थर्ड पार्टीची गरज भासणार नाही

नवीन QR Code प्रक्रियेद्वारे डेटा ट्रान्सफर करणे थर्ड पार्टी अॅप्स वापरण्यापेक्षा अधिक सुरक्षित असल्याचे व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे. फास्ट मेसेज (Message) सेवेनुसार यात Privacy धोरणाचा अभाव आहे. हे क्लाउड सेवांपेक्षा अधिक खाजगी देखील आहे, कारण डेटा फक्त तुमच्या दोन डिव्हाइसेसमध्ये सामायिक केला जातो आणि ट्रान्सफर प्रक्रियेदरम्यान पूर्णपणे एनक्रिप्ट केलेला असतो.

व्‍हॉट्सअॅपने पूर्वी समान ऑपरेटिंग सिस्‍टमच्‍या डिव्‍हाइसमध्‍ये डेटा ट्रान्स्फर करण्‍यासाठी क्लाउड बॅकअपचा वापर केला जात होता. पण नवीन पद्धत क्लाउडवर चॅट्सचा बॅकअप घेण्याची गरज काढून नाहिसी करते. तथापि, तरीही नियमितपणे आपल्या डेटाचा बॅकअप घेणे सर्वोत्तम उपाय आहे. या पद्धतीचा वापर करून, वापरकर्ते त्यांच्या चॅट हिस्ट्रीचा बॅकअप घेऊ शकतात आणि मोठ्या मीडिया फाइल्स आणि लिंक्स त्वरित ट्रान्सफर करू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

Ambajogai News : स्मशानभूमी नसल्याने मृतदेह ठेवला नगरपरिषद कार्यालयाबाहेर; अंबाजोगाईत लिंगायत समाज आक्रमक

SCROLL FOR NEXT