Spam Message On WhatsApp Whatsaap
लाईफस्टाईल

Spam Messageचा वैताग आलाय? WhatsAppच्या 'या' फीचरने दूर करा मेसेजची डोकेदुखी, जाणून घ्या प्रक्रिया

Spam Message : व्हॉट्सॲपसाठी एक नवीन फीचर आणण्यात आले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स मोबाईल अनलॉक न करता स्पॅम मेसेज पाठवणाऱ्याला सहज ब्लॉक करू शकतात. नंबर ब्लॉक करण्यासाठी कोणतेही ॲप उघडण्याची गरज नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Block Spam Message On WhatsApp:

व्हॉट्सॲप हे इन्स्टंट मेसेजिंग ॲप असून त्याची लोकप्रियता सर्वांना माहितीये. मार्केटिंग प्रमोशनसाठी अनेक कंपन्या या ॲपचा फायदा घेतात आणि अनेक सायबर गुन्हेगारही याचा फायदा घेत असतात. यामुळे हे मेसेज उघडणे कधीकधी आपल्या अंगाशी येत असते. अनेकवेळा युझर्स अनावश्यक मेसेजमुळे वैतागत असतात. नको असलेल्या मेसेजमुळे कामाचे मेसेज देखील ते पाहणं चूकवत असतात.(Latest News)

आज आपण अशा एका खास ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यातून तुम्ही लॉक स्क्रीनवर स्पॅम मेसेज ब्लॉक करू शकता. अनेक दिवसांपासून या फीचरची मागणी होत होती. दरम्यान व्हॉट्सॲपमध्ये हे फीचर आता आणण्यात आले आहे. जर तुम्हाला हे फीचर मिळाले नसेल तर तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करून घ्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हॉट्सॲप युझर्सला कसे करावे ब्लॉक?

व्हॉट्सॲप अँड्रॉइड युझर्स स्पॅम संपर्क नंबर लॉक स्क्रीनवर दिसण्यापासून रोखण्यासाठी मेसेजस डावीकडे स्वाइप करा. यानंतर तीन बिंदूंवर टॅप करा. यानंतर ब्लॉकचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर Report Contact वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ज्या मेसेज पाठवणाऱ्याची तक्रार करायची आहे त्याच्या नंबरचा रिपोर्ट निवडा.

व्हॉट्सॲपवर अनोळखी नंबरवरून येणारे कॉल कायमचे म्यूट केले जाऊ शकतात. यासाठी व्हॉट्स ॲप ओपन करा आणि तीन डॉट्सवर क्लिक करून सेटिंगमध्ये जा. यानंतर गोपनीयता पर्याय निवडा आणि खाली स्क्रोल करा. कॉलसाठी एक पर्याय असेल, त्यावर अज्ञात कॉलर्सला सायलेन्स करण्याचा पर्याय निवडा. यानंतर स्पॅम नंबर किंवा अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आपोआप म्यूट होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arnav Khaire : अर्णव खैरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; लोकलमध्ये मारहाण करणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल

Mahayuti Tension: सन्मानजनक द्या नाहीतर तुमचा खेळ खल्लास; शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला अल्टिमेटम

Sunday Horoscope : धनलाभ होणार, हातात पैसा खेळता राहणार; 5 राशींच्या लोकांना बंपर लॉटरी लागणार

Maharashtra Politics : मी स्टार प्रचारक, खर्चाची अजिबात चिंता करू नका; ऐन निवडणुकीत भाजप नेत्याचं वक्तव्य, चर्चांना उधाण

Terror Attack: पाकिस्तान आखतोय भारताविरुद्ध कट; ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी पुन्हा सक्रिय

SCROLL FOR NEXT