WhatsApp  Saam tv
लाईफस्टाईल

WhatsApp Channel Features : Whatsappचं भन्नाट फीचर ! तुमच्या आवडीचे 'चॅनल' ठरतील फायदेशीर

How To Use WhatsApp Channel Features : इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने चॅनल्स हे नवीन फीचर आणले आहे.

कोमल दामुद्रे

WhatsApp New Features : WhatsApp आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन अपडेट आणत असते. या WhatsApp चे जाळे जगभरात असंख्य ठिकाणी पसरले आहे. यावरुन आपल्या एकमेकांशी सहज संवाद साधता येतो.

मागच्या काही काळापासून WhatsApp ने त्याच्या युजर्ससाठी नवे अपडेट (Update) आणले आहेत. यावर्षी तर WhatsApp ने वापरकर्त्यांसाठी अनेक नवे अपडेट आणले आहे. अशातच इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने चॅनल्स हे नवीन फीचर (Feature) आणले आहे. या चॅनल फीचरच्या मदतीने अनेक मोठ्या ग्रुपमध्ये मेसेज करता येऊ शकतो. WhatsApp हे फीचर कॉलेज, संस्था व कंपन्यांसाठी फायदेशीर (Benefits) ठरणार आहे.

1. WhatsApp चे नवे फीचर

याचे थेट कनेक्शन हे संस्थांसोबत असणार आहे. हे फीचर विश्वासार्ह व खाजगी असेल. यामुळे तुमचा कोणताच डेटा लिक होणार नाही. तुम्ही फॉलो केलेल्या चॅनलचे स्टेटस व इतर माहीती आपल्या पाहाता येईल. तसेच हे नवे फीचर्स सध्या सिंगापूर व कोलंबियामध्ये लॉन्च करण्यात आले आहे. लवकरच भारतातही लॉन्च होईल असे मेटाने सांगितले आहे.

2. कसे काम करेल WhatsAppचे फीचर

व्हॉट्सअॅप चॅनेलमुळे आपल्याला मेसेज, फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स पाठविण्याची परवानगी मिळेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही चॅनल फॉलो करू शकता. यासाठी फक्त आपल्याला आपली आवड नेमकी कोणती हे तिथे सांगावे लागेल. त्यानुसार चॅनेल हे काम करेल व त्याचे नवे अपडेट मिळतील.

3. वैयक्तिक माहीती राहील अधिक सुरक्षित

या नव्या अपडेटमुळे तुमचा फोन नंबर अॅडमिन किंवा इतर फॉलोअर्सना दिसणार नाही. तुम्ही कोणत्या चॅनेलचे अनुसरण करू इच्छिता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. व्हॉट्सअॅपच्या वापरकर्त्यांची संख्या संपूर्ण जगात 2 अब्जांपेक्षा जास्त आहे. व्हॉट्सअॅपने ही सेवा सुरू करण्याबाबत म्हटले आहे की, "आमचे ध्येय हे जगातील सर्वात खाजगी प्रसारण सेवा बनवण्याचे आहे. यामुळे अनेक व्यवसायिक कंपनीना कमाई करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT