प्राणायाम म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ Saam Tv
लाईफस्टाईल

प्राणायाम म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ

जर आपण योग्य रितीने श्वासोच्छवास केला, तर त्याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Breath is not just air, it is Life! असं कायम म्हटलं जातं. श्वास घेणं म्हणजे केवळ शरीरात हवा भरणं नाही. तर, श्वास घेण्याचीदेखील एक पद्धत आहे. जर आपण योग्य रितीने श्वासोच्छवास केला, तर त्याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो. विशेष म्हणजे योगाभ्यासातही प्राणायाम करण्याला फार महत्त्व आहे. प्राणायामाच्या माध्यमातून आपण योग्यरितीने श्वास कसा घ्यावा, श्वासावर नियंत्रण कसं मिळवावं हे शिकू शकतो. परंतु, त्यापूर्वी प्राणायाम म्हणजे नेमकं काय ते जाणून घेऊयात.

हे देखील पहा -

कुठल्याही प्रसंगी तुम्ही निरीक्षण करून पाहा. आपल्या मनाच्या अवस्थेचा श्वासावर सगळ्यात अगोदर परिणाम होतो. कधी राग आला, भीती वाटली, अस्वस्थता वाटली तर श्वासही अस्थिर होतो. याउलट झोपेत किंवा मन शांत असेल, तेव्हा श्वासही संथ आणि लयबद्ध असतो. मन आणि श्वासाच्या या नात्यामुळे प्राणायामाचा अभ्यास गरजेचा आहे. मनाच्या अवस्थेप्रमाणे श्वास बदलतो, याउलट प्रयत्नपूर्वक श्वासाच्या गतीमध्ये बदल केला तर मनाच्या अवस्थेत बदल घडू शकतो. ते शांत होऊ शकते. मनाला शांत हो सांगितलं, तर ते होणं खूप कठीण आहे. त्याच्या गतीबरोबर आपण तासनतास भटकत राहू. श्वासाच्या माध्यमातून मनाचं नियंत्रण करण्याचे शास्त्र म्हणजे प्राणायाम.

प्राणायामाचा अर्थ

निरोगी मनुष्य मिनिटाला साधारण १५ वेळा श्वास घेतो, म्हणजे दिवसाला २१ हजार ६०० वेळा. महर्षी पतंजली म्हणतात, ‘‘या नैसर्गिक गतीचा विच्छेद (breaking the pattern) म्हणजे प्राणायाम. मग तो मिनिटाला पंधरापेक्षा जास्त म्हणजे गती वाढवणे किंवा कमी करणे. श्वासोच्छवासाला स्वाभाविक गतीत प्रयत्नपूर्वक, प्रमाणबद्ध, विशिष्ट फळाच्या उद्देशाने बदल करणे म्हणजे प्राणायाम.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

RBI Recruitment: इंजिनियर झालात? रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Solapur Temple Tourism: अक्कलकोट ते पंढरपूर, सोलापूरमधील या TOP 8 स्थळांना उन्हाळ्यात नक्कीच भेट द्या, मन होईल प्रसन्न

Ayan Ahmed Case: १८० मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या अयानचा नवा VIDEO समोर, तरुणाचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात दररोज केस धुवावे की नाही? घाम आणि कोंडा होऊ नये म्हणून काय करावे?

SCROLL FOR NEXT