Health Passport  Saam Tv
लाईफस्टाईल

Health Passport : हेल्थ पासपोर्ट म्हणजे नेमक आहे तरी काय? अशा पद्धतीने करू शकता अप्लाय, जाणुन घ्या

Passport : आपल्याला जेव्हा आऊट ऑफ इंडिया जायचं असत तेव्हा आपल्याजवळ पासपोर्ट असणे अत्यंत आवश्यक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

How To Apply For Health Passport : आपल्याला जेव्हा आऊट ऑफ इंडिया जायचं असत तेव्हा आपल्याजवळ पासपोर्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे पासपोर्ट नसेल तर आपण कधीच दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही.

आजकाल अनेक व्यक्ती स्वतःचा पासपोर्ट बनवून घेतात. या नॉर्मल पासपोर्ट बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, परंतू तुम्हाला जर का हेल्थ पासपोर्ट बद्दल विचारण्यात आले तर तुमचे उत्तर काय असेल ?

हेल्थ पासपोर्ट काय असते -

संपुर्ण जगाला माहीत आहे की, मागील काही वर्षांमध्ये पूर्ण विश्वावर कोरोनाचे संकट आले होते. आज सुद्धा अनेक देशांमध्ये जाण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे नियम (Rules) फॉलो करावे लागतात. अशातच अनेक देश असे सुद्धा आहेत, जिथे कोणतेच बंधन किंवा अट नाही, परंतु त्याआधी अनेक देशांमध्ये हेल्थ पासपोर्ट देखिल मागितले जाते.

हेल्थ पासपोर्ट (Passport) हे एक प्रकारचे मेडिकल सर्टिफिकेट असते. ज्यामध्ये हे माहीत पडते की, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार नाही आहे. खासकरून हृदयासंबंधीचे आजार, कोरोना इत्यादी. जर तुमच्या पासपोर्टवर अस लिहिलेलं असेल की, तुम्ही एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर तुमच्या प्रवासामध्ये तुमची विशेष काळजी घेतली जाते.

हेल्थ पासपोर्टचे फायदे -

प्रत्येक व्यक्तीसाठी हेल्थ पासपोर्ट अत्यंत आवश्यक आहे. अशातच त्या व्यक्तींसाठी पासपोर्ट अत्यंत गरजेचा आहे. ज्या व्यक्तींना एका आठवड्यामधून दोन ते तीनवेळा देशाबाहेर जावे लागते. खासकरून बिझनेसमॅनसाठी अत्यंत जरुरी असते.

जर एखादा व्यक्ती एखाद्या आजाराने ग्रस्त आहे आणि हेल्थ पासपोर्टवर लिहिलेलं असेल की, विमानयात्रे दरम्यान त्या व्यक्तीकडे विशेष लक्ष दिले जाते. हेल्थ पासपोर्टच्या मदतीने कोणताही अडथळा आणि खत्र्याच्या आपल्या यात्रेला कोणीही पूर्वक करू शकते.

कसे असते हेल्थ पासपोर्ट -

आतापर्यंत तुम्हाला हे कळलं असेल की हेल्थ पासपोर्ट किती महत्वाचं आहे. हेल्थ पासपोर्ट कसे असते असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर , हेल्थ पासपोर्ट हा डिजीटल असू शकते त्याचरोबर कागदोपत्री देखील असू शकते. अनेकवेळा एअरपोर्टतर्फे हेल्थसंबंधी एक कागद दिला जातो. ज्यामध्ये आजाराबद्दल सांगितले जाते.

हेल्थ पासपोर्ट कसे बनवायचे -

हेल्थ पासपोर्ट बनवने कोणत कठीण काम नाही आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुमची यात्रा सुखकर जावो तर, तुम्ही पासपोर्ट केंद्रातर्फे हेल्थ फॉर्म भरून याचा फायदा करून घेऊ शकता. सोबतच एअरपोर्टवरती सुध्दा एक फॉर्म मिळतो ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आजाराबद्दल लिहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT