overdose of eating vitamin d side effect, Health issue  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

'ड' जीवनसत्त्वाच्या औषधांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचे दूष्परिणाम कसे होतात ?

जीवनसत्त्व ड चे शरीरात प्रमाण वाढल्यास शरीरावर परिणाम कसा होईल.

कोमल दामुद्रे

मुंबई : आपल्या शरीरासाठी प्रत्येक जीवनसत्त्व हे मूलभूत प्रमाणात आवश्यक असतात. परंतु, त्याचे ठराविक प्रमाणातच सेवन केल्यास ते फायदेशीर ठरतात.

हे देखील पहा -

जीवनसत्त्व हे आपल्या शरीरासाठी जितके चांगले असतात तितकेच त्याचे शरीरात वाढलेले प्रमाण हे आपल्याला अधिक घातक ठरू शकतात. त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. आपल्यापैकी बरेच जण डॉक्टरांचा सल्ला न घेता जीवनसत्त्वाच्या सप्लिमेंट घेत असतात. आपल्या त्याबद्दल माहित नसल्यामुळे त्याचे सेवन आपण करत जातो. त्यामुळे आपल्याला आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. जीवनसत्त्व हे शरीरासाठी आवश्यक असले तरी त्याचे ठराविक प्रमाणात सेवन केल्यास फायदा होतो. त्याचे सेवन शरीरात जास्त प्रमाणात झाल्यास आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आपल्या शरीरावर कसा दूष्परिणाम होते हे जाणून घेऊया.

१. ड जीवनसत्त्व हे सूर्यप्रकाशाच्याद्वारे त्वचेद्वारे शोषले जाते. शरीरातली कॅल्शियमचे प्रमाण वाढवून हाडे मजबूत करण्याचा प्रयत्न करते. ड जीवनसत्त्वाचे प्रमाण शरीरात कमी झाल्यास हाडांची झीज होते. यामुळे मुलांमध्ये जीवनसत्त्व ड च्या कमतरतेमुळे मुडदूस होऊ शकतो.

२. अधिक प्रमाणात ड जीवनसत्त्वाचे प्रमाण शरीरात झाल्यास उलट्या, मळमळ व ओटीपोटीत दुखणे, वजन कमी (Weight loss) होणे, वारंवार तहान लागणे, जुलाब यांसारख्या लक्षणे दिसू लागतात.

३. शरीरात जीवनसत्त्वाचे (Vitamins) प्रमाण अधिक झाल्यास शरीरातली कॅल्शियमची पातळी वाढते व त्यामुळे हाडांचा त्रास जाणवू शकतो.

४. तसेच याचे प्रमाण अधिक झाल्यास नैराश्य, बध्दकोष्ठता, कोमात जाण्याची समस्या वाढू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT