Petrol-Diesel Price  Saam Tv
लाईफस्टाईल

देशात इंधन दरवाढीचा भडका! आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर काय?

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल- डिझेलचे भाव जारी केले

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल- डिझेलचे भाव जारी केले आहेत. आज देशात पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Price) स्थिर आहे. मागील ३ आठवड्यांपासून पेट्रोल (Petrol Price) -डिझेलच्या भावामध्ये कोणता देखील बदल करण्यात आला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावामध्ये घट झाल्याचे बघायला मिळत आहे. तरी देखील आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशामध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत.

दरम्यान, याअगोदर ६ एप्रिल दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात (Petrol Diesel Price) प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलने जारी केलेल्या नवीन भावानुसार, राष्ट्रीय राजधानीत १ लिटर पेट्रोलचे भाव (Petrol Price) १०५.४१ रुपये असून डिझेल (Diesel Price) ९६.६७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असणाऱ्या मुंबईमध्ये १ लिटर पेट्रोलसाठी १२०.५१ रुपये, तर १ लिटर डिझेलसाठी १०४.७७ रुपये मोजावे लागत आहेत.

हे देखील पाहा-

इंडियन ऑईलने जारी केलेल्या भावानुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलचे भाव ९१.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रात परभणीमध्ये पेट्रोल १२३.४७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. देशाच्या राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोलचे भाव १०५.४१ रुपये आहे. तेल कंपन्यांनी २२ मार्च नंतर सलग १४ वेळा भाववाढ केली होती.

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीला ब्रेक लागला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल १०.२० रुपयांनी महाग झाले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या भावात परत एकदा वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. यामुळे देशात परत एकदा पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचे सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आपल्या शहरातील भाव काय?

शहरं पेट्रोलचे भाव (प्रति लिटर) डिझेलचे भाव (प्रति लिटर)

मुंबई 120.51 104.77

दिल्ली 105.41 96.67

चेन्नई 110.85 100.94

कोलकाता 115.12 99.83

हैद्राबाद 119.49 105.49

कोलकाता 115.12 96.83

बंगळुरू 111.09 94.79

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT