Weight loss Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Weight loss Tips : दिवाळीत स्लिम फिट दिसायचे आहे ? फक्त 'हे' करा, आठवड्याभरात फरक दिसेल !

वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायामाबरोबर पुरेशा प्रमाणात आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे.

कोमल दामुद्रे
Weight Loss Tips

सणासुदीच्या काळात आपण अधिकतर गोडाचे किंवा मिठाईचे सेवन करतो. ज्यामुळे आपले वजन सहज वाढू लागते. स्वादिष्ट आणि चविष्ट पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. यामुळे पचनसंस्था देखील खराब होते. (Latest Marathi News)

Weight Loss

हल्ली अधिकतर तरुण पिढी ही वाढलेल्या वजनामुळे ग्रस्त आहे. वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायामाबरोबर पुरेशा प्रमाणात आहार घेणे देखील महत्त्वाचे आहे. अशावेळी वजन कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे हे जाणून घेऊया

Beetroot Juice

बीटाच्या ज्यूसमध्ये लोह असते. शरीरात लोहाची कमतरता होत नाही. तसेच यात असलेले फायबर हे पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे वजन कमी (Weight loss) होण्यासही मदत होते.

Lemon Juice

लिंबूमध्ये जीवनसत्त्व (Vitamins) क भरपूर प्रमाणात असते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. तसेच यात आले घातल्याने चयापचय गती वाढते. लिंबू आणि आल्यापासून बनवलेला रस तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतो.

Apple Juice

तुम्ही सफरचंदाचा रसही सेवन करू शकता. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. बद्धकोष्ठता आणि सूज पासून आराम देते. याचे सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यासही मदत होते.

Vegetable Juice

पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. पालक किंवा कोबीपासून बनवलेला रसही पिऊ शकता. या भाज्यांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यांचे सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT