Egg Hakka Noodles Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Egg Hakka Noodles Recipe : चायनीज फूड टेस्ट करायचं आहे ? घरच्या घरी बनवा हॉटेलसारखं एग हक्का नूडल्स, पाहा रेसिपी

Chinese Food : व्हेज नूडल्स, हक्का नूडल्स आणि शेझवान नूडल्स यांसारख्या लोकप्रिय प्रकारांसह नूडल्सचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

कोमल दामुद्रे

Noodles Recipe : नूडल्स हा आपल्यापैकी बहुतेकांचा आवडता पदार्थ आहे. हा पटकन पण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी कधीही तयार आणि खाऊ शकता. व्हेज नूडल्स, हक्का नूडल्स आणि शेझवान नूडल्स यांसारख्या लोकप्रिय प्रकारांसह नूडल्सचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

नूडल्सची आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारे बनवता येते. प्रत्येक प्रकारचे नूडल्स खायला खूप चवदार असतात. परंतु, अनेकांना एग नूडल्स खायला आवडते. जाणून घेऊया ते बनवायचे कसे

1. साहित्य

  • 1 पॅकेट नूडल्स

  • 2 अंडी

  • 1 गाजर

  • 1 सिमला मिरची

  • १ मध्यम कांदा

  • 1 टीस्पून व्हिनेगर

  • 1/2 टीस्पून सोया सॉस

  • 1/2 टीस्पून केचप

  • 1 टीस्पून चिली सॉस

  • चवीनुसार मीठ (Salt)

  • गरजेनुसार काळी मिरी पावडर

  • हिरवे कांदे

2. कृती

  • सर्व प्रथम एका पातेल्यात पाणी (Water) घेऊन त्यात मीठ आणि नूडल्स घालून ५-६ मिनिटे उकळा.

  • आता नूडल्स गाळून त्यात थोडे चमचा तेल टाकून 10-15 मिनिटे ठेवा.

  • यानंतर एका भांड्यात अंडी, मीठ आणि काळी मिरी पावडर घालून मिक्स करा.

  • आता त्यापासून ऑम्लेट बनवा आणि त्याचे लहान तुकडे करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अंड्याची भुर्जी बनवू शकता.

  • यानंतर कढईत तेल टाकून सर्व भाज्या घालून २-३ मिनिटे मंद आचेवर तळून घ्या.

  • आता नूडल्स, व्हिनेगर, सोया सॉस, मीठ, काळी मिरी, केचप आणि चिली सॉस घाला.

  • सर्व साहित्य एकत्र सुमारे 2 मिनिटे शिजवा.

  • आता शिजवलेले अंडे आणि स्प्रिंग ओनियन्स घाला, नीट ढवळून घ्या आणि आणखी एक मिनिट शिजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT