Parenting Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलांमधील आत्मविश्वास वाढवायचा आहे ? पालकांनी 'या' 3 गोष्टींकडे लक्ष द्या

प्रत्येक पालकांनी लहानपणापासूनच आपल्या मुलांना आत्मविश्वास वाढवायचा असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Parenting Tips : प्रत्येक पालकांनी लहानपणापासूनच आपल्या मुलाला आत्मविश्वास वाढवायचा असतो. कधी-कधी मुलं आयुष्यातील अनेक चांगल्या संधी केवळ आत्मविश्वासाच्या अभावामुळे गमावतात. आपल्या मुलांमध्ये आत्मविश्वास कमी पडू देऊ नये ही प्रत्येक पालकाची जबाबदारी बनते. चला जाणून घेऊया त्या 3 प्रभावी टिप्स (Tips) , ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांमध्ये (Children) नवीन आत्मविश्वास भरू शकता.

मुलांची स्तुती करा -

मूल जेव्हा चांगले काम करेल तेव्हा त्याची स्तुती करा. तुम्ही असे केल्याने त्याला पुढच्या वेळी अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि तो प्रत्येक उपक्रमात अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल.

मुलांवर प्रेम करा -

तुमचा चुकीचा टोन आणि बोलण्यासाठी वापरली जाणारी भाषा यामुळे अॅप वर वाचा मुलाला अस्वस्थ वाटू शकते. अशा परिस्थितीत तुमच्या मुलांसाठी वेळ काढा आणि त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. त्यांचे शब्द आवडीने ऐका. यामुळे मुले नेहमी आत्मविश्वासू राहतील.

नकारात्मक विचारांपासून दूर राहा -

मुले नकळत त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून खूप काही शिकतात. अशा परिस्थितीत मुलांना नकारात्मक वातावरणापासून दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी बनते. तसेच त्यांच्यासमोर कधीही नकारार्थी शब्द वापरू नका, तुम्हाला जमणार नाही, तुम्ही पडाल, तुम्हाला दुखापत होईल इत्यादी. असे केल्याने मुलावर नकारात्मक परिणाम होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT