Dark Circles on skin Saam Tv
लाईफस्टाईल

Dark Circles on skin : चेहऱ्यावरील काळे डाग घालवायचे आहेत ? 'या' फळांच्या रसाचा वापर करा

फळांचा वापर करून आपण चेहऱ्यावरील कोरडेपणा काळे डाग मुरूम इत्यादी समस्या दूर करू शकतो

कोमल दामुद्रे

Dark Circles on skin : स्किन समस्यासाठी व्हिटॅमिनस आणि मिनरल्स याचे भरपूर प्रमाण असते त्यामुळे तुमच्या अनेक चेहऱ्याच्या समस्या दूर राहतात. फळांचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहते.

फळांचे अनेक फायदे आपल्या आरोग्यासाठी (Health) चांगले असतात. तसेच फळांचा वापर करून आपण चेहऱ्यावरील कोरडेपणा काळे डाग मुरूम (Pimples) इत्यादी समस्या दूर करू शकतो चला तर मग बघूया फळांचा रस वापरून चेहऱ्याच्या समस्या दूर कशा केल्या जातील

1. संत्र्याचा रस

Orange Juice

तेलकट चेहऱ्यासाठी संत्र्याचा रस फार उपयुक्त असतो.एका वाटीत संत्र्याचा रस घेऊन त्यामध्ये थोडे मध मिक्स करून चेहऱ्याला लावून पंधरा मिनिटे सोडून द्या आणि पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

2. डाळिंबचा रस

Pomegranate juice

डाळिंब रसात व्हिटॅमिन (Vitamins) सी आढळते जे त्वचेसाठी फायद्याचे असते. डाळिंबाच्या रसामुळे आद्रता चेहऱ्यावर टिकून राहते. डाळिंबमधील अनेक गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

3. काकडीचा रस

Cucumber Juice

काकडीच्या रसाचा नियमित वापर करून तुम्ही चेहऱ्याच्या समस्या दूर करू शकता.काकडी मधील पोषक तत्वे चेहऱ्यासाठी उपयुक्त असतात. व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते. जे चेहऱ्यावर चमक ठेवण्यास फायदेशीर असते.

4. गाजर रस

Carrot juice

तुमच्या फेस पॅक मध्ये गाजरचा उपयोग करून तुम्ही चेहऱ्यावरील काळे डाग कमी करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट गाजरचा रस चेहऱ्यावर लावू शकता.

5. स्ट्रॉबेरी रस

Strawberry juice

चमचा भर बेसनात स्ट्रॉबेरी रस मिक्स करून चेहऱ्यावर पंधरा मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर चेहरा (Skin) पाण्याने (Water) स्वच्छ धुऊन घ्या. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग हळूहळू कमी होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT