IRCTC Tour Package Saam Tv
लाईफस्टाईल

IRCTC Tour Package : फक्त 7 हजारात करा तिरुपती बालाजीचे दर्शन, IRCTC चा नवा टूर पॅकेज !

Travel Plan : दरवर्षी अनेक लोक येथे केवळ सुंदर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठीच येत नाहीत तर येथे उपस्थित असलेल्या मंदिरांनाही भेट देतात.

कोमल दामुद्रे

Tirupati Balaji Travel Plan : जगभरात संस्कृती आणि परंपरांसाठी प्रसिद्ध असलेले भारत हे धार्मिक स्थळ म्हणूनही खूप लोकप्रिय आहे. दरवर्षी अनेक लोक येथे केवळ सुंदर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठीच येत नाहीत तर येथे उपस्थित असलेल्या मंदिरांनाही भेट देतात.

तिरुपती बालाजी या मंदिरांपैकी (Temple) एक मंदिर देखील जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने देश-विदेशातील लोक येथे भेट देण्यासाठी येतात. या क्रमाने, नुकतेच IRCTC ने तिरुपती बालाजीसाठी खास टूर (Tour) पॅकेज जारी केले आहे. चला तर मग जाणून घेऊया या पॅकेजशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील

1. प्रवास कधी सुरू होणार?

IRCTC ने जारी केलेल्या या टूर पॅकेजचा कालावधी तीन रात्री आणि चार दिवसांचा असेल. हा प्रवास 21 मार्चपासून सुरू होणार असून या तारखेपासून 26 मार्चपर्यंत तुम्हाला ट्रेन मिळेल. तुम्ही तुमच्या सोयीनुसार प्रवासाची तारीख निवडू शकता. या स्पेशल टूर पॅकेजला तिरुपती बालाजी दर्शन एक्स मुंबई असे नाव देण्यात आले आहे. या टूर पॅकेजची सुरुवात मुंबईपासून (Mumbai) होईल म्हणजेच तुम्हाला तिरुपती बालाजीसाठी मुंबई ट्रेन मिळेल.

2. प्रवासाचे वेळापत्रक कसे असेल

या टूर पॅकेज अंतर्गत तुम्ही MGR चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास कराल. भारतीय रेल्वेच्या (Railway) या टूर पॅकेजची सुरुवात मुंबईपासून होणार आहे. पण मुंबई व्यतिरिक्त तुम्ही पुणे आणि सोलापूर येथूनही ही ट्रेन पकडू शकता. या प्रवासाअंतर्गत, तुम्हाला आंध्र प्रदेशात असलेल्या तिरुपती बालाजीला भेट मिळेल आणि प्रवासाच्या शेवटी, तुम्हाला पुन्हा मुंबई, पुणे किंवा सोलापूर स्टेशनवर सोडले जाईल.

3. खर्च

भाड्याबद्दल बोलायचे झाले तर IRCTC ने तिरुपती बालाजीसाठी जारी केलेल्या या पॅकेजचे भाडे अत्यंत कमी ठेवले आहे. या प्रवासाअंतर्गत तुम्ही ट्रेनमध्ये थर्ड एसी आणि स्लीपर कोचमध्ये प्रवास करू शकाल. जर तुम्ही थर्ड एसी बुक करत असाल तर यासाठी तुम्हाला एका व्यक्तीसाठी 12100 रुपये, दोन व्यक्तींसाठी 10400 रुपये आणि तीन लोकांसाठी 10300 रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही स्लीपर तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला एका व्यक्तीसाठी 9050 रुपये, दोन लोकांसाठी 7390 रुपये आणि तीन लोकांसाठी 7290 रुपये मोजावे लागतील.

4. या सुविधा टूर पॅकेजमध्ये उपलब्ध असतील

IRCTC च्या या टूर पॅकेजसाठी निश्चित केलेल्या भाड्याच्या रकमेसह तुम्हाला अनेक सुविधा देखील मिळतील. या सुविधांमध्ये रेल्वे भाडे, तिरुपतीमध्ये एका रात्रीचे हॉटेलमध्ये एक जेवण आणि नाश्ता, प्रेक्षणीय स्थळे, बालाजी मंदिर दर्शन पास, स्थानिक टूर गाइड, प्रवास विमा, जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. प्रवासाशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी आयआरसीटीसी कार्यालयातही जाता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT