Viral News  google
लाईफस्टाईल

Viral News: चिप्स खाल तर लवकर म्हातारे व्हाल? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Chips Side Effect: तुम्ही जर चिप्स खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.कारण, तुम्ही म्हातारे होऊ शकता. आम्ही असं का म्हणतोय, ते तुम्ही ही बातमी पाहिल्यानंतरच कळेल.

Sandeep Chavan

तुम्ही चिप्स खाता का? चवीचवीनं चिप्स खात असाल तर सावध व्हा. कारण, तुम्ही चिप्स खाल्ल्याने लवकर म्हातारे व्हाल. हे आम्ही म्हणत नाही. तर सोशल मीडियावर असे अनेक मेसेज व्हायरल होतायत. एका संशोधनातून हे सिद्ध झाल्याचं काही न्यूज पेपर, ब्लॉगर्सनी असा दावाही केलाय. मात्र, हे खरं आहे का? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

चिप्स सारखे अति-प्रक्रिया केलेले जंकफूड खाल्ले तर डीएनएचे नुकसान करतात. ज्यामुळे पेशींचा मृत्यू होतो आणि शरीरातील अवयव जलद वृद्ध होतात.यामुळे हार्ट अटॅक, डायबिटीस, ब्लडप्रेशर, जुनाट आजारांचा धोका वाढतो. हा दावा गंभीर आहे,,,चिप्स हे स्वस्तात मिळत असल्याने अनेकजण चिप्स खातात. मात्र, चिप्स बनवण्यासाठी त्याची प्रक्रिया खूप मोठी असते. तेलात मोठ्या प्रमाणात चिप्स तळले जातात आणि हेच चिप्स आपल्या आरोग्यावर परिणाम करतात.प्रत्येकाच्या आरोग्याशी हे संबंधित असल्याने आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली.. आमच्या प्रतिनिधींनी याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञांची भेट घेतली. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला.

त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

चिप्स हे जंकफूड अति प्रक्रिया करून बनवतात

जंकफूड आपल्या डीएनएचे नुकसान करतात

शरीरातील पेशी मृत पावल्याने माणूस कमजोर होतो

शरीरातील अवयव वृद्ध झाल्यामुळे आजारपण वाढतं

शरीर थकल्याने माणूस लवकर म्हातारा होतो.

त्यामुळे आमच्या पडताळणीत चिप्स, जंकफूड सतत खाल्ल्याने माणूस लवकर म्हातारा होऊ शकतो हा दावा सत्य ठरलाय...त्यामुळे असे जंकफूड खाणं टाळायला हवं...निरोगी आरोग्य जगण्यासाठी हेल्दी पदार्थ खायला हवेत...नाहीतर स्वस्त आणि मस्त चिप्स आपल्याला लवकर म्हातारे करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

Makeup Tips: जुने मेकअप प्रॉडक्ट्स वापरताय? होऊ शकतं इन्फेक्शन, अशी घ्या काळजी

Crime: ४ वेळा 'दृश्यम' चित्रपट पाहिला, नंतर बायकोला संपवलं; मृतदेह भट्टीत जाळला अन्..., पुणे हादरले

Maharashtra Live News Update: धुळ्यात मंकीपॉक्सचा सहावा रुग्ण; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

SCROLL FOR NEXT