Vasubaras 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Vasubaras 2023 : वसुबारस कधी आहे? गोवत्स द्वादशीला पूजा कशी कराल? जाणून घ्या योग्य मुहूर्त

Govatsa Dwadashi 2023 : गोवत्स द्वादशीला पूजा कशी कराल? पूजेचा मुहूर्त काय? जाणून घेऊया याबद्दल

कोमल दामुद्रे

Vasubaras 2023 Tithi :

दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि दिव्यांचा सण. या दिवसात आपल्या सर्वत्र रोशनाई पाहायला मिळते. तसेच फटाके, रांगोळी आणि दिव्यांची आरास म्हणून हा सण ओळखला जातो.

या पाच दिवसात सर्वत्र प्रकाश पाहायला मिळतो. तसेच प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असते. यंदा दिवाळीचा हा सण ९ नोव्हेंबरपासून सुरु होणार असून १५ नोव्हेंबरला त्याची सांगता होईल. दिवाळीची सुरुवात ही वसुबारस सणाने होते. हा सण या वर्षी ९ नोव्हेंबरला साजरा केला जाईल. गोवत्स द्वादशीला पूजा कशी कराल? पूजेचा मुहूर्त काय? जाणून घेऊया याबद्दल

1. वसुबारस कधी आहे?

आश्विन कृष्ण पक्ष एकादशी गुरुवार, ९ नोव्हेंबरला वसुबारसचा सण साजरा केला जाईल. वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी देखील असणार आहे. या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. गोडाधोडाचा नैवेद्य (Food) दाखवला जातो.

2. पूजा मुहूर्त

वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी गाय-वासराची पूजा करतात. गोवत्स द्वादशीचा मुहूर्त हा सायंकाळी ०५.३१ मिनिटे ते ०८.०९ मिनिटांपर्यंत आहे.

3. पूजा पद्धत

या दिवशी दारात रांगोळी (Rangoli) काढून दिव्यांची आरास केली जाते. दिवाळीचा पहिला सण आणि पहिला दिवा या दिवशी लावला जातो. गावाकडच्या भागात सुवासिनी स्त्रिया गाय- वासरुची पूजा या दिवशी करतात. गायीच्या पायांवर पाणी घालून हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात, ओवाळतात. पुरणपोळीचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवतात. शहराकडच्या भागात घरोघरी मातीच्या गाय-वासराची पूजा केली जाते. तसेच दिवाळीच्या (Diwali) सणाला सुरुवात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT