Four simple Vastu tips for a rented house saam tv
लाईफस्टाईल

भाड्याच्या घरात सूख-शांत नांदत नाही? सारखी चिडचिड होते? 'या' ४ वास्तु उपायांनी नकारात्मकता होईल दूर

Vastu Tips : घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे, पुरेसा सूर्यप्रकाश येऊ देणे, खिडक्या उघडून हवा खेळती ठेवणे. सुगंधाचा वापर करणे यामुळे घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटू शकते. वास्तुशास्त्रातही अशा गोष्टींना महत्त्व दिले जाते.

Bharat Jadhav

  • नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी अनेक जण भाड्याच्या घरात राहतात.

  • सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी मोठे बदल करणे आवश्यक नाही

  • वास्तुशास्त्रातील उपाय हे पारंपरिक समजुतींवर आधारित आहेत

नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त अनेकजण स्वतःच्या घरापासून दूर जातात. दुसऱ्या भागात दुसऱ्या शहरात भाड्याच्या घरात ते राहतात. भाड्याच्या घरात राहताना कधीकधी अनेकांना नकारात्मकतेची भावना निर्माण होत असते. यामुळे आम्ही काही वास्तु उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही भाड्याच्या घरात राहूनही तिथे सकारात्मक वातावरण निर्माण करू शकता. तसेच तेथे तुम्हाला सूख-शांती मिळेल. या उपायांसाठी कोणत्याही प्रकारच्या रचनात्मक बदलांची किंवा वस्तूंची जागा बदलण्याची गरज पडणार नाही.

मीठ आणि तुरटीनं नकारात्मकता होईल दूर

जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल. तुम्हाला तिथे नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर दररोज पाण्यात मीठ मिसळून संपूर्ण घर पुसून घ्यावे. असे केल्याने नकारात्मकता हळूहळू दूर होण्यास मदत होत असते. याशिवाय घरातील कोणत्याही एका कोपऱ्यात काचेच्या वाटीत थोडे मीठ आणि काही खडे तुरटीचे तुकडे ठेवल्यास जीवनात सकारात्मकता येण्यास मदत होऊ शकते. हा मात्र दर १५ दिवसांनी हे मीठ आणि तुरटी बदलण्यास विसरू नका.

पूजाघर आणि ईशान्य कोपरा ठेवा स्वच्छ

ईशान्य कोपरा ज्याला 'ईशान कोन' असे म्हटले जाते. ते देवांचे निवासस्थान मानले जाते. याच ठिकाणी पूजेसाठी देव-देवतांच्या मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केल्या जातात. त्यामुळे ईशान्य कोपरा आणि पूजाघर नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. जर दररोज स्वच्छता करणे शक्य नसेल, तर किमान दिवसाआड तरी त्यांची स्वच्छ करा. असे केल्याने 'वास्तुदोष' दूर होण्यास मदत होते. देव-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

तुमच्या घरातील भिंती आणि पडद्यांकडे लक्ष द्या

वास्तूनुसार, रंगांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर भिंतींना गडद रंगाने रंगवणे टाळावं, कारण यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. भिंतींसाठी फिकट पिवळा, पांढरा किंवा क्रीम रंगांचा वापर करणे योग्य असते. त्याचप्रमाणे, घरासाठी फिकट रंगांचे पडदे निवडणेही एक चांगला पर्याय आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकपरंपरांवर आधारित आहे. त्यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. साम टीव्हीही याला दुजोरा देत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : झोपेत अचानक उंचीवरून पडल्यासारखा झटका बसतोय? 'या' गंभीर कारणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

MLC Election Result: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीला झटका; शरद पवार गटाच्या उमेदवाराची आघाडी

कॅबिनेट संपताच 5 IAS आणि 4 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; प्रशासनात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: छत्रपती संभाजीनगर: आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मते

कर्तव्य बजावताना दुर्दैवी अंत: , आरोपीचा पाठलाग करताना पिंपरीच्या ३८ वर्षीय हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT