Vastu Tips Saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : घरात या ५ गोष्टी ठेवाच! येईल सुख-समृद्धी, वैवाहिक नात्यात वाढेल प्रेम; पैशांची चणचण होईल कमी

Vastu Tips For Money : लाख प्रयत्न करूनही अनेकदा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. पैशांची चणचण भासते, खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही. वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्या नशिबावर परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

लाख प्रयत्न करूनही अनेकदा आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. पैशांची चणचण भासते, खर्चावर नियंत्रण ठेवता येत नाही. वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्या नशिबावर परिणाम होतो.

अशातच आपली एक चूक आपल्याला अधिक महागात पडू शकते. वास्तूनुसार घरातील प्रत्येक दिशेला अधिक महत्त्व आहे. घरातील प्रत्येक दिशा ही सकारात्मक असते. अशातच जर तुम्हाला सतत पैशांची चणचण भासत असेल, वैवाहिक (Marriage) नात्यात (Relation) अडचणी येतील असतील तर या ५ गोष्टी तुम्ही घरात ठेवायला हव्या.

1. नारळ

घरात तुम्ही छोटा नारळ ठेवल्याने लक्ष्मीचा वास राहातो असे म्हटले जाते. तसेच आर्थिक (Money) समस्या दूर होतात.

2. कासव

अनेकदा घरात चांदी, पितळ किंवा कास्य याचे कासव पाहिले जाते. कासव हा विष्णूचा अवतार मानला जातो. असे मानले जाते की, घरात धातूचे कासव ठेवल्याने पैशांशी संबंधित समस्या दूर होतात. त्यासाठी कासव नेहमी उत्तर दिशेला ठेवा

3. पिरॅमिड

वास्तूशास्त्रानुसार पिरामिड घरात ठेवल्याने आर्थिक समृद्धी आणि आशीर्वाद मिळतो. त्यासाठी घरात क्रिस्टल पिरॅमिड असल्यास उत्पन्नात वाढ होते. तसेच करिअरमध्ये प्रगती होते. पिरॅमिड नेहमी अशा ठिकाणी ठेवा जेथे तुम्ही जास्त वेळ घालवाल.

4. गोमती चक्र

शास्त्रामध्ये गोमती चक्र अतिशय शुभ मानले जाते. गोमती चक्र घरात ठेवल्याने सुख, शांती आणि समृद्धी राहाते. असे म्हटले जाते की, ११ गोमती चक्र पिवळ्या कापडात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते.

5. कमलगट्टा हार

आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कमलगट्ट्याचा हार शुभ मानला जातो. यामुळे धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद

IPL: गुवाहाटीत होणार RR अन् मुंबई इंडियन्सचा हाय-व्होल्टेज सामना, कोणाचं पारडं आहे जड? जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड

Bugadi Earrings Designs: लग्नात नवरीसाठी बुगडीचे 5 नवीन प्रकार, सौंदर्य दिसेल भारी

Navi Mumbai: नवी मुंबईत गोळीबाराचा थरार, सामाजिक कार्यकर्त्यांवर धाड धाड गोळ्या झाडल्या

नागपुरात बॉम्ब सदृश्य वस्तू अन् जिलेटिनच्या कांड्या; परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT