Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : बेडरुममध्ये या गोष्टी ठेवल्याने नवरा-बायकोच्या नात्यात येतो दूरावा, वास्तूच्या नियमानुसार आजच फेकून द्या

Vastu Tips For Relationship : वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्या नात्यावर परिणाम होतो. घरामध्ये सर्वकाही सुरळीत असताना अचानक मोठी संकटे येऊ लागतात. घरामध्ये पंचतत्वांचा समावेश असतो त्यासाठी याचे संतुलन ठेवणे देखील गरजेचे आहे.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Bedroom :

वास्तूशास्त्रानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्या नात्यावर परिणाम होतो. घरामध्ये सर्वकाही सुरळीत असताना अचानक मोठी संकटे येऊ लागतात. घरामध्ये पंचतत्वांचा समावेश असतो त्यासाठी याचे संतुलन ठेवणे देखील गरजेचे आहे.

पती पत्नीच्या नात्याचा परिणाम हा संपूर्ण घरावर होत असतो. परंतु, त्याच्यातील वादाचा सर्वात मोठा परिणाम हा मुलांवर होतो. जेव्हा बेडरुममध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा घरात कलह निर्माण होतो. याची अनेक कारणे असू शकतात. वास्तूशास्त्रानुसार बेडरुममध्ये जर चुकीच्या वस्तू ठेवल्यास नात्यात दूरावा येतो. जाणून घेऊया बेडरुममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नये त्याबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बेडरुममध्ये कधीही फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा ठेवू नये. मग तो ड्रेसिंग टेबलचा असो किंवा वॉशरुमचा. तुटलेली काच सर्वात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे नात्यात (Relationship) दूरावा येतो.

जर कोणत्याही कारणांमुळे पती-पत्नीच्या (Wife) नात्यात दूरावा निर्माण झाल्यास बेडरुमच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला लव्ह बर्ड्स किंवा मॅड्रिन बदकांची जोडी ठेवावी. यामुळे नात्यात प्रेमभावना निर्माण होते.

बेडरुममध्ये या गोष्टी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. यामुळे नात्यात गोडवा निर्माण होतो. तसेच रुममध्ये हिंसक प्राण्यांचा फोटो (Photo), देवाची मूर्ती किंवा कोणताही फोटो नसावा. वैवाहिक आयुष्यासाठी चांगले नसते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा भाजपमध्ये प्रवेश, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: फक्त ६ दिवस! लाडक्या बहिणींनो मुदतीपूर्वी KYC करा, कोणती कागदपत्रे आवश्यक, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात लोणिकंद-थेऊर फाटा येथे भीषण अपघात

Winter Alert : महाराष्ट्रात कडाक्याची थंडी! तापमान ११ अंशांच्या खाली, 'या' जिल्ह्यांना हुडहुडी

Sangli crime : सांगलीत 'मुळशी पॅटर्न' स्टाईल खून, वाढदिवशीच नेत्याची हत्या, त्यानंतर...

SCROLL FOR NEXT