Valentine Day Love Letter In Marathi:  saam tv
लाईफस्टाईल

Love Letter: '143 प्रेमपत्र! 'बघितलं मी पहिल्यांदा, जीव अडकला तुझ्यात पहिल्यांदा'

Valentine Day Love Letter In Marathi: प्रत्येक गोष्ट आपण आपल्या प्रिय व्यक्तीला सांगू शकतं नाही. मनातील भाव आपल्या ओठांवर येत नाहीत. त्यामुळे पत्राद्वारे आपल्या भावना तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवा.

Bharat Jadhav

प्रिय, सोनपापडी

(सोनपापडी) तुला मी कसं सांगू तेच कळत नाहीये. तुझा नंबर माझ्याकडे नाहीये. तुझ्याशी संपर्क कसा करावा तेच कळत नाहीये. मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. हे सांगण्याचा कोणताच मार्ग नव्हता, त्यामुळे आता जुन्या पद्धतीनं तुला पत्र लिहून माझ्या मनातील भावना सांगत आहे. तुला माझं बोलणं खोटं वाटेल पण तुला जेव्हा पाहतो ना माझ्या हृदयाची धकधक वाढते. ठोके इतक्या जोरात पडू लागतात की बस कधी. एखादा लोहार लोखंडावर मोठ्या हातोड्याचा सनासन वार करतो ना तसे ठोके जोर जोरात पडू लागतात. मनात भीतीही वाटू लागते. पण तुला पाहिलं नाही ना तर मन बेचैन होतं. तू दिसलीस ना सगळीकडे कसं आनंदी आनंद असं वाटू लागतं.

मागच्या आठवड्यात तू कॉलेजला आली होतीस तेव्हा तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला. पण शब्द फुटत नव्हते. बाकी गोष्टींवर गप्पा केल्या पण जे बोलायचं होतं ते मनातच राहून गेलं. माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम भावना आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर मी खूप प्रेम करतो. जसं की हीर रांझा, सोनी महिवाल सारखेच माझं प्रेम आहे. तुला कधीही फसवणार नाही. मी प्रेमात पडायचं कधी ठरलं नव्हतं. कोणातच माझा जीव अडकला नव्हता. पण तुला पाहिल्यानंतर माझं मन तुझ्यात कसं अडकलं तेच मला कळत नाहीये.

तू जेव्हा पहिल्यांदा क्लासमध्ये आली होतीस. त्यावेळी तू शेवटच्या बाकावर बसली होतीस. कोणीतरी तुला हाक मारली होती. त्यावेळी मी तुला मागे वळून पाहिलं होतं. तुझं माझ्याकडे लक्ष नव्हतं पण मी तुला पाहत होतो. त्यावेळी तुला पाहिल्यानंतर ' देखा जो तुझे यार, दिल में बजी गिटार असं गाणं माझ्या डोक्यात फिरू लागलं होतं. तेथेच मी माझं मन हरवलं. माझा दिल तुला दिला.

एकदा का कोणामध्ये जीव अडकला तर असं वाटतं की जीव गेला तरी चालेल पण तू आयुष्यातून गेली नाही पाहिजे. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. खरंच मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. माझे तुझ्यावर लय लय म्हणजे लय म्हणजे लय प्रेम आहे.

तुझाच मी

***

मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?

जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!

प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!

आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...

भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...

तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Besan Chilla Recipe : भाजी खाऊन कंटाळलात? मग ५ मिनिटांत बनवा बेसनाचा कुरकुरीत पोळा

Chum Chum Recipe: लाफ्टर शेफमध्ये दाखवलेली स्वादिष्ट चमचम मिठाई घरच्या घरी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Nashik Crime : पोलिसाची दादागिरी; वकिलाला डोके फुटेपर्यंत मारलं, VIDEO

Nandurbar: आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, जमिनीवर पाडून एकमेकांना धूधू धुतलं; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: नितीन नबिन यांची भाजप अध्यक्षपदी बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT