Valentine Day Love Letter: 
लाईफस्टाईल

Valentine Day Love Letter: 'जाने तू या जाने ना; नया प्यार है, नया इंतज़ार'

Valentines Love Letter In Marathi: आपल्या मनातील भावना पत्राद्वारे आपल्या प्रिय व्यक्तीला सांगा. कधी-कधी आपल्या मनातील प्रेम शब्दात मांडता येत नाही, बोलताना तोंडातून शब्द फुटत नाहीत. त्यामुळे आपल्या मनातील भावना पत्रातून करा व्यक्त.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रिय निकीता

साँसें मेरी,

जिंदगी भी मेरी,

और मोहब्बत भी मेरी..

मगर हर चीज मुकम्मल करने के लिए जरूरत है तेरी..

मी तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे.

'आय लव्ह यू' हे वाक्य किती छोटं आणि किती सोपं वाटतं ना, तुला माहितीये हे वाक्य कागदावर लिहिण्यासाठी आणि ओठांवर आणण्यासाठी मला जवळपास चार महिने लागली. हो, कदाचित तुला हे वाचून हसू येईल, पण तुला काय सांगावी माझ्या हृदयाची तडफड. तुला 'आय लव्ह यू' बोलयला माझी हिंमत होत नाही आणि न बोलता मला राहता येत नाहीये. मनी धनी तुच मला दिसतेस.

अशी एक रात्र गेली नाही की, ज्या रात्री तू स्वप्नात आली नाहीस. स्वप्नात तू माझ्यासाठी अख्ख्या जगाशी पंगा घेतेस, इतकेच नाही तर तू तुझ्या वडिलांनाही थेट आपल्या प्रेमाचं नातं सांगतेस. पण जसं स्वप्न संपतं त्याच्या दुसऱ्याच क्षणी माझे डोळे उघडतात, आणि वास्तिवता दाखवतात. तू मोठ्या घरातील मुलगी आहेस, शिवाय तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस, पण मलाही माहितीये तुझाही जीव माझ्यात अडकलाय.

तुझ्यावर प्रेम करतोय हे सांगणं इतकं अवघड झालंय ना, तू समोर आलीस का शब्द फूटत नाहीत. हृदयाचे ठोके २०० च्या स्पीडनं पडू लागतात. बोलताना बोबडी वळू लागते, माझ्या मनात तुझ्याविषयी प्रेम भावना आहेत, हे तुला कसं सांगावं हे कळत नाहीये. पण म्हणतात ना,

अगर किसी चीज़ को शिद्दत से चाहो,

तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है!

अगदी तसेच माझ्या मदतीला साम टीव्हीचं व्हॅलेंटाइन विशेष उपक्रम धावून आला. त्याच व्यासपीठाचा फायदा घेत मी तुझ्यासाठी प्रेमपत्र लिहितोय, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला वाटतं तुझंही माझ्यावर प्रेम आहे. मला पाहण्यासाठी तू तुमच्या घराच्या छतावर सारखं जातेस. तुझ्या काकाच्या घरी जाताना तुझं ते मागे वळून वळून पाहणं मनात काहूर माजवतं. तुला काय सांगू तुझं हसणं पाहून किती आनंद होतो.

तुझं हसणं पाहून असं वाटतं की माझ्या आजूबाजुला मस्त रोमँटिक गाणी चालू आहेत. जेव्हा मी तुला पाहतो, तेव्हा सारं जग विसरतो. फक्त तू आणि मीच असल्याचा भास होतो. कोणी मला आवाज दिला तरी मला तूच असल्याचा भास होतो, तुच सांग हे प्रेम नाहीतर काय? मला तू दिसली नाहीस तर कसं तरी होतं. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.

आय लव्ह यू...

तुझाच मी...

मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?

जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!

प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!

आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...

भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...

तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टिळक भवन येथे वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष व संघटन सृजन अभियानाचे समन्वयक यांची बैठक सुरु

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिमंडळात फेरबदल होणार? २ बड्या नेत्यांवर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा

Viral Video: बॉयफ्रेंडशी लग्न लावून द्या नाहीतर...! प्रेमासाठी तरूणी चढली टॉवरवर, व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT