Valentine Day Love Letter In Marathi:  saam tv
लाईफस्टाईल

Valentine Day Love Letter: 'तू आहेस म्हणून तर सगळं माझं आज आहे', Happy Rose Day नवरोबा!

Valentine Day Love Letter In Marathi: अनेकवेळा आपल्या मनातील भावना शब्दातून व्यक्त करू शकत नाहीत. त्या बोलून दाखवता येत नाहीत. त्यामुळे पत्राच्या माध्यमातून आपलं प्रेम व्यक्त करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रिय आनंद...

माझे अहो, लव्ह यू... तसं आपण फोनवर बोलतोच पण पत्रातून मी अधिक मोकळेपणाने बोलू शकते असं मला वाटतं. प्रेम पत्र लिहिण्यास हा चांगला योग आहे, त्याचं कारण म्हणजे साम डिजीटलनं व्हॅलेंटाइन स्पेशल मनातलं ओठांवर सुरू केलेलं नवीन सदर आणि दुसरं म्हणजे आजपासून व्हॅलेंटाइन वीक सुरू झालाय. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला 'हॅपी रोझ डे, आणि आय लव्ह यू....'

हे वाचताना तुम्हाला हसू आले ना? तुम्ही म्हणत असाल छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचीड करणारी मी आज कसं काय 'लव्ह यू', 'लव्ह यू' करतेय. पण तुम्हाला सांगू का, माझं रागवणं तुम्हाला दूर करणं नाहीये. पण तुमच्याविषयी असलेली काळजी आणि अभाळाइतकं भलं मोठं प्रेम दाखवणं आहे. मी तुम्हाला असं टेन्शनमध्ये पडलेलं पाहू शकत नाही. मला माहितीये तुम्हाला घराच्या जबाबदारीचं टेन्शन आहे, आई-वडील, भाऊ, यांचेही टेन्शन तुमच्या डोक्यात आहे. जास्त चिंता नका करू माझे अहो..

माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हा लग्न तर झालंय अजून काय आता त्यात बोलायचं असं तुम्ही म्हणाल, पण वेळोवेळी प्रेम व्यक्त केलं पाहिजे. तुम्हाला माहितीये ना, साचलेल्या पाण्यालाही शेवाळं लागतं, त्यामुळे आपणही आपल्या नात्याला पुन: पुन्हा उजाळा दिला पाहिजे. नाहीतर नात्यातील आनंद निघून जात असतो.

तुम्ही काळजी नका करू मी तुमच्या आणि तुमच्या आई-वडिलांमध्ये अंतर पडू देणार नाही. तुम्ही आई-बाबांशी जास्त कनेक्ट आहात, मला माहितीये. त्यांच्यापासून दूर जाणं तुमच्या मनाला खाणारं आहे. लहानपणापासून तुम्ही त्यांचे लाडके आहात. तुमचाही त्यांच्यावर जीव आहे. तुम्ही विभक्त होण्याचा विचार करू नका.

माझ्या घराच्यांनी सांगितलं असेल तरी तुम्ही त्याचा विचार करू नका. तुम्ही मला का आवडता माहितीये, तुम्ही सर्वाचं मन राखतात. सगळ्यांची काळजी घेता. ज्यावेळी तुम्ही पाहायला आले होते, त्यावेळी तुम्ही ज्याप्रकारे माझ्या घरच्यांशी आपलेपणाने बोलत होता. ते पाहून मी तुच्यावर फिदा झाले होते. सर्वांना मदत करण्याचा स्वभाव खूप आवडतो.

फूल ही फूल याद आते हैं

आप जब जब भी मुस्कुराते हैं

तुमची मी कारभारीन, स्वाती

छत्रपती संभाजीनगर,पैठण

मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?

जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!

प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!

आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...

भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...

तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT