Valentine Day Propose Love Letter saam tv
लाईफस्टाईल

Valentine Day Love Letter: 'प्यार के कागज़ पे दिल की कलम से', शाळेतील पहिलं प्रेम आठवणारं पत्र

Valentine Day Propose Love Letter: मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये? पत्रातून आपलं प्रेम व्यक्त करा. तुमच्या आवडत्या व्यक्तीला सांगा त्यांच्यावर तुमचं किती प्रेम आहे. जिवापाड प्रेम करणाऱ्यांना प्रेम व्यक्तच करता येत नाही, त्यामुळे आपल्या भावानांना पत्रातून वाट मोकळी करून द्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रिय, ....

सकाळी प्रार्थनेच्यावेळी जाताना तुझ्या वर्गाकडे माझी नजर गेली. त्या वर्गातील बाकावर असलेली तुझी बँग पाहून मला बरं वाटलं. बेचैन झालेलं मन स्थिरावू लागलं. तब्बल दोन दिवसानंतर तू मला माझ्या डोळ्याला दिसणार आहेस. तुला सांगू हा, आनंद वर्गात एक नंबर येण्यापेक्षा मोठा वाटतोय. काय जबर फिलिंग आहे ही. खरंच प्रेम हा शब्द छोटा असला तरी त्यातील फिलिंग लय मोठी आहे.

दोन दिवस शाळेत तू नव्हतीस तर माझं मन सैरवैर धावत होतं. मनात नको-नको त्या गोष्टी येत होत्या. गणिताच्या तासाला मी भुगोलाचं पुस्तक बाकावर ठेवून उत्तर काढत होतो. जेवणाच्या सुट्टीला इंग्रजीचा तास समजत होतो. काय करावं तेच कळत नव्हतं. तुला सांगू भुगोलाचं पुस्तक पाहून गणिताच्या सरांनी जो काही चोपलाय ना... मला तसं बापानंही मारलं नाही. पण यात तुझी आठवण मनात होती. तुझा हसरा चेहरा डोळ्याभवती फिरत होता. त्यामुळे मला सरांचे फटकेही फुलांसारखे वाटत होते.

किती दिवसांपासून तुला सांगू सांगू म्हणत होतो, पण दोन दिवसांपासून तू दिसली नव्हतीस. आज तू शाळेत आल्याचं समजल्यानंतर, तुला खेळाच्या तासाला सांगायचं ठरवलं. पण माझ्या तोंडातून शब्द फुटणार नाहीत. आणि तुझ्यासोबत तुझ्या मैत्रिणींचा गराडा असेन. त्यामुळे मी मोठ्या हिंमतीनं माझ्या मनातील भावना या लव्ह लेटरमधून व्यक्त करतोय. तू असलीस ना लय झक्कास वाटतं. तुला पाहिल्यानंतर मी सगळ काही विसरतो. फक्त आणि फक्त तूच दिसतेस. लय जीव जडू लागलाय तुझ्यावर. खरंच मी लय प्रेम करतो तुझ्यावर.. मला तू हो म्हणशील का?

तुझ्या मनातही माझ्याविषयी भावना आहेत का? मला वाटतंय तुझ्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे. उगाच नाही त्या दिवशी तुझी नजर मला वर्गात शोधत होती. मला हेही माहितीये तू त्या सीमाकडून माझं मराठीचं पुस्तक मागून घेतलं होतं. तुझ्याकडे ते पुस्तक होतं तरी तू मागून घेतलंस. तुझं माझ्याकडे पाहून हळूच हसणं, नंतर काहीतरी काम काढून मुलांच्या रांगेत येत माझ्या बाकाजवळ थांबणं, हे सगळं माहितीये.

जर मनात काही नाही तर मग उगाच का तुझा बाक माझ्या बाकाच्या बाजुला लावून घेतलास? मला माहिती आहे तुझंही माझ्यावर प्रेम आहे. पण मुलींच्या मनात काय आहे हे देवही ओळखू शकत नाही. तर मी कसा ओळखणार. त्यामुळे जर तुझंही हो, असेन तर तू या लव्ह लेटरला अर्ध्यातून फाड आणि शाळेतील वडाच्या झाडाजवळ असलेल्या दगडाखाली ठेव.

आठवण नको तुझी साथ हवी,

तुझ्या प्रेमाची वाट हवी…

तुझाच मी .....

भरतप्रेम....

टीप : मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये? जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!

प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!

आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...

भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...

तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT