Glowing Skin  Saam Tv
लाईफस्टाईल

Homemade Face Pack: ग्लोइंग त्वचेसाठी मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅकचा असा करा वापर!

Glowing Skin Tips: व्यस्त जीवनशैलीमुळे खूप लोक योग्य आहार घेत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Skin Care: व्यस्त जीवनशैलीमुळे खूप लोक योग्य आहार घेत नाही. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात परिणाम तुमच्या त्वचेवर होतो जर आपण योग्य आहार घेतला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही, त्वचेच्या समस्या होत नाही आपण नेहमी निरोगी राहतो आणि आपली त्वचा टवटवीत राहते.

आपण चेहऱ्याची थोडीफार काळजी घेणे देखील आवश्यक आहे. कोरडी त्वचा आणि निरोगी (Healthy) त्वचेचा त्रास तुम्हाला होत असेल तर त्वच (Skin) सुधारण्यासाठी या फेसपॅकचा वापर एकदा केलाच पाहिजे.

चिंचेच्या लगद्यामध्ये पोषक तत्वे असतात जे त्वचेला एकस्फोलिएट करण्यासाठी मदत करते त्यामुळे त्वचेत सुधारणा होते आणि त्वचा पूर्वीपेक्षा अधिक चांगली दिसते. चिंचे मध्ये विटामिन सी असते जे चेहऱ्याचा रंग निखळण्यासाठी कार्य करते. चेहऱ्यावरील तेल काढण्यासाठी त्यांच्यापासून बनवलेल्या मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक वापरून पहा.

चिंच आणि मुलतानी मातीचा फेस पॅक बनवण्यासाठी साहित्य -

चिंचेचा कोळा – २ चमचा

मुलतानी माती – १ चमचा

एलोवेरा जेल – १ चमचा

मुलतानी माती आणि चिंचेचा फेस पॅक बनवण्याची पद्धत खालील प्रमाणे -

हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम चिंचेचा कोळ दोन ते तीन चमचे पाण्यात विरघळून ते पाणी गाळून घ्या.आता त्या चिंचेच्या पाण्यात मुलतानी माती, एलोवेरा जेल चांगले एकजीव करून बाजूला ठेवून द्या.

तयार फेस पॅक वापरन्या अगोदर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि हा फेसपॅक पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित लावून घ्या साधारणपणे 15 ते 20 मिनिट चेहऱ्यावर राहू द्या फेस पॅक सुकून चांगले कडकड होईपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. फेस पॅक सुकल्याने चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. या फेस पॅक चा वापर केल्याने तुम्हाला त्वचेवर हळूहळू फरक जाणवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT